चिखली येथे आणखी सात रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:43 AM2021-05-07T04:43:51+5:302021-05-07T04:43:51+5:30

0000 ग्रामसेवक, शिक्षकांची पदे रिक्त वाशिम : रिठद जिल्हा परिषद गटातील ग्रामसेवक, शिक्षकांची जवळपास नऊ पदे रिक्त आहेत. ...

Seven more patients at Chikhali | चिखली येथे आणखी सात रुग्ण

चिखली येथे आणखी सात रुग्ण

Next

0000

ग्रामसेवक, शिक्षकांची पदे रिक्त

वाशिम : रिठद जिल्हा परिषद गटातील ग्रामसेवक, शिक्षकांची जवळपास नऊ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याची मागणी पूर्ण झाली नाही.

००००००००००

कलावंतांच्या समस्या सोडविण्याची मागणी

वाशिम : गेल्या १० महिन्यापासून प्रलंबित मानधनासह वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन समिती गठित करण्याच्या मागणीसाठी लोककलावंत संघटनेने विविध टप्प्यात आंदोलन केले. मात्र, याची दखल घेण्यात आली नाही. कलावंतांना कमीतकमी पाच हजार रुपये दरमहा मानधन सुरू करावे, अशी मागणी कलावंत संघटनेने बुधवारी केली.

०००००

लक्षणे असल्यास चाचणी करावी

वाशिम : मालेगाव शहर व तालुक्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. सर्दी, ताप व खोकला, घसा खवखवणे आदी लक्षणे असणाऱ्या संदिग्ध रुग्णांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन तालुका प्रशासनाने गुरुवारी केले.

०००००००

‘रिचार्ज शाफ्ट’मुळे जलपातळी स्थिर

वाशिम : महामार्गाच्या कामासाठी गौण खनिजांची पूर्तता करण्यासाठी मंगरुळपीर तालुक्यातील शेलगाव शिवारातील शेततळे भूजल विकास आणि सर्वेक्षण संस्थेने तीन ‘रिचार्ज शाफ्ट’ खोदले आहेत. यामुळे या परिसरात भूजल पातळीत फारशी घट नाही.

000000000000

स्त्री रुग्णालयात स्वच्छता अभियान

वाशिम : कोरोनाबाधितांवर उपचारासाठी जनसेवेत रुजू केलेल्या वाशिम येथील स्त्री रुग्णालय परिसरात घाणकचरा वाढला होता. या पार्श्वभूमीवर रुग्णालय परिसरात दैनंदिन स्वच्छता करण्यात येत आहे.

000000000000000

मुख्य चौकात लोंबकळत्या वीजतारा!

वाशिम : शिरपूर जैन येथील बसस्थानक परिसरात मुख्य चौकातील अतिशय वर्दळीच्या ठिकाणी महावितरण कंपनीच्या गार्डिंग नसलेल्या वीजतारा लोंबकळत्या स्थितीत आहेत. या तारा तुटल्यास अपघात घडण्याची भीती आहे.

00000000000000000

किन्हीराजा येथे दोन रुग्ण

वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे आणखी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

००००००००००००००

देपूळ येथे सांडपाण्याची व्यवस्था

वाशिम : देपूळ ग्रामपंचायतीने ऑपरेशन सांडपाणी ही मोहीम हाती घेतली असून, ग्रामपंचायतीने गावातील मुख्य रस्त्यावर दोन्ही कडेला नाल्याची निर्मिती करून गावातील सांडपाण्याला व्यवस्थित बाहेर काढले आहे. ही व्यवस्था गावकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.

००००००००००००००

सभापतींनी घेतला आढावा

वाशिम: जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी गुरुवारी ग्रामीण भागातील कोरोनाविषयक स्थितीसंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्याकडून आढावा घेतला.

०००००००००००००

पांदण रस्त्याचे काम रखडले

वाशिम : देपूळ परिसरातील जुन्या पांदण रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री योजनेतून या रस्त्याचे काम करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे बुधवारी केली आहे.

००००००००००००००००

Web Title: Seven more patients at Chikhali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.