बारावीच्या निकालात वाशिम जिल्हा अमरावती विभागात द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 04:08 PM2020-07-16T16:08:35+5:302020-07-16T16:09:43+5:30

वाशिम जिल्हा ९४.०८ टक्के निकालासह अमरावती विभागात द्वितीय स्थानावर आहे.

Second in Washim district in class XII results | बारावीच्या निकालात वाशिम जिल्हा अमरावती विभागात द्वितीय

बारावीच्या निकालात वाशिम जिल्हा अमरावती विभागात द्वितीय

googlenewsNext

वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २0२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल १६ जुलै रोजी जाहिर झाला असून, वाशिम जिल्हा ९४.०८ टक्के निकालासह अमरावती विभागात द्वितीय स्थानावर आहे. १८ हजार ६८० विद्यार्थ्यांपैकी १७ हजार ५७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १८ हजार ७५६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १८ हजार ६८० विद्यार्थी परीक्षेला बसले होती. त्यापैकी १७ हजार ५७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९४.०८ टक्के एवढी आहे. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ३२५९ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ९३५७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४७७२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, १८७ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९८.२९ टक्के, कला शाखेचा ८९.८७ टक्के, वाणिज्य शाखेचा ९५.७९ टक्के तर व्होकेशनल शाखेचा ८५.४१ टक्के निकाल लागला आहे. 
 
रिपिटर विद्यार्थ्यांचा ४४.२३ टक्के निकाल
जिल्ह्यात बारावी परीक्षेसाठी ८१४ रिपिटर विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी सर्वच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ३६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ४४.२३ आहे. विज्ञान शाखेचा ४६.४९ टक्के, कला शाखेचा ४४.२२ टक्के, वाणिज्य शाखेचा ५७.१४ टक्के तर व्होकेशनलचा ३५.७१ टक्के निकाल लागला.
 
निकालात विद्यार्थीनींचीच बाजी
गतवर्षीच्या बारावीच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली होती.  यावर्षी मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. मुलांच्या निकालाची टक्केवारी ९२.९२ आहे तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.५२ आहे. ११ हजार १०८ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ३२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ७५७२ विद्यार्थिनींपैकी ७२५३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या.
 
रिसोड तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर
यावर्षी जिल्ह्यात रिसोड तालुक्याचा सर्वाधिक ९५.८१ टक्के निकाल लागला आहे. त्याखालोखाल वाशिम तालुक्याचा ९४.७८ टक्के, मालेगाव तालुक्याचा ९४.२३ टक्के, मंगरूळपीर तालुक्याचा ९३.४२ टक्के, कारंजा तालुक्याचा ९१.८५ टक्के तर सर्वात कमी निकाल मानोरा तालुक्याचा ९१.५८ टक्के लागला आहे.

Web Title: Second in Washim district in class XII results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.