२८ जूनपासून शिक्षकांसाठी उघडणार शाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:49 PM2021-06-16T16:49:06+5:302021-06-16T16:49:30+5:30

School to open for teachers from June 28 : कोणत्या वर्गातील शिक्षकांनी किती प्रमाणात उपस्थित राहावे, याबाबत मार्गदर्शक सूचनाही शिक्षण विभागाने जारी केल्या.

School to open for teachers from June 28! | २८ जूनपासून शिक्षकांसाठी उघडणार शाळा !

२८ जूनपासून शिक्षकांसाठी उघडणार शाळा !

Next

वाशिम : कोरोनाकाळात शैक्षणिक कामकाज प्रभावित होऊ नये म्हणून चालू शैक्षणिक सत्रात २८ जूनपासून शिक्षकांसाठीशाळा सुरू होणार आहेत. कोणत्या वर्गातील किती शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहावे, याबाबत मार्गदर्शक सूचनाही शिक्षण विभागाने १४ जूनला जारी केल्या आहेत.
वाशिमसह विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २७ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर केल.त्यानुसार शाळांचे शैक्षणिक वर्ष २८ जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष वर्गात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू होणार नसली तरी शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज, दहावी व बारावीचा निकाल तयार करण्यासाठी मुल्यांकनाचे काम आदीसाठी शिक्षकांना शाळेत यावे लागणार आहे. कोणत्या वर्गातील शिक्षकांनी किती प्रमाणात उपस्थित राहावे, याबाबत मार्गदर्शक सूचनाही शिक्षण विभागाने जारी केल्या. कोविड-१९ परिस्थितीमुळे पुढील सुचनेपर्यंत शाळा बंद असल्यातरी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आॅनलाईन व इतर माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीतपणे सुरू राहील याची दक्षता सर्व शाळा प्रशासनाने घ्यावी, अशा सूचनाही प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांना दिल्या. दरम्यान विद्यार्थ्यासाठी शाळा बंदच राहणार आहेत. 
 
 
२८ जूनपासून जिल्ह्यातील शाळा शिक्षकांसाठी सुरू होणार आहेत. कोणत्या वर्गातील किती शिक्षकांनी किती प्रमाणात उपस्थित राहावे याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत. या शाळा फक्त शिक्षकांसाठी उघडण्यात याव्या, अशा वरिष्ठांच्या सूचना आहेत. विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना नाहीत.
- आकाश आहाळे
उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम

Web Title: School to open for teachers from June 28!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.