संत रामराव महाराज अनंतात विलिन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2020 01:32 PM2020-11-01T13:32:46+5:302020-11-01T16:03:48+5:30

Sant Ramrao Maharaj News संत रामराव महाराज अनंतात विलिन !

Sant Ramrao Maharaj merges into infinity! | संत रामराव महाराज अनंतात विलिन !

संत रामराव महाराज अनंतात विलिन !

Next
ठळक मुद्देसकाळी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी पोहरादेवी येथे ठेवण्यात आले.रामराव महाराज यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.

मानोरा (वाशिम) : बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांचे लिलावती रुग्णालय मुंबई येथे शुक्रवारी रात्रीदरम्यान देहावसान झाले. रविवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात पोहरादेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. संत डॉ. रामराव महाराज यांची प्रकृती गत एका वर्षापासून अस्थिर होती. शुक्रवार, ३० आॅक्टोबर रोजी त्यांनी लिलावती रुग्णालय मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला. मुंबई येथून त्यांचे पार्थिव शनिवार, ३१ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजतादरम्यान पोहरादेवी येथे आणण्यात आले. रविवार, ३१ आॅक्टोबर रोजी सकाळी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी पोहरादेवी येथे ठेवण्यात आले. कुटुंबाकडून तसेच भाविकांकडून पूजा आरती झाल्यानंतर संत रामराव महाराज यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.

Web Title: Sant Ramrao Maharaj merges into infinity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.