बुलडाण्यातील ‘त्या’ मृतक रुग्णाच्या वाशिम येथील नातेवाईकाचे नमुने तपासणीला पाठविले नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:42 PM2020-03-31T17:42:07+5:302020-03-31T17:42:14+5:30

‘थ्रॉट स्वॅब’ नमुने तपासणीसाठी अद्याप पाठविले नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी मंगळवारी दिली.

Samples of a relative of the deceased patient in Washim have not been sent for investigation! | बुलडाण्यातील ‘त्या’ मृतक रुग्णाच्या वाशिम येथील नातेवाईकाचे नमुने तपासणीला पाठविले नाही !

बुलडाण्यातील ‘त्या’ मृतक रुग्णाच्या वाशिम येथील नातेवाईकाचे नमुने तपासणीला पाठविले नाही !

Next
कमत न्यूज नेटवर्कवाशिम : बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला. या रुग्णाला आजारी असताना काही दिवसापूर्वी वाशिम येथील त्याचा नातेवाईक भेटण्यासाठी गेल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून वाशिम येथील नातेवाईक इसमाला ३० मार्च रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील विलगीकरण (क्वारंटाईन) कक्षात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवले आहे; परंतु कोरोना विषाणू संदर्भातील कोणतीही लक्षणे त्याच्यात आढळून आली नसल्याने त्याच ‘थ्रॉट स्वॅब’ नमुने तपासणीसाठी अद्याप पाठविले नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी मंगळवारी दिली. वाशिम जिल्ह्यात अद्यापपर्यंत ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. तथापि, बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला. या रुग्णाला आजारी असताना तीन-चार दिवसापूर्वी वाशिम येथील काही नातेवाईक भेटण्यासाठी गेले होते. तसेच सदर रुग्णाच्या अंत्यविधीला सुध्दा काही नातेवाईक उपस्थित असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यामुळे खबरदारी म्हणून वाशिम येथील बागवान पुºयातील एका नातेवाईकाला जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण (क्वारंटाईन) कक्षात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. दरम्यान, सोमवारी माहिती घेतली असता सदर इसम कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्यसंस्कारात सहभागीच झाला नसल्याचे सदर इसमाने सांगितल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी सोमवारी दिली, तसेच त्या इसमात कोरोना विषाणूच्या संसर्गाची कोणतीच लक्षणे अद्याप आढळली नसल्याने त्याच्या ‘थ्रॉटचे स्वॅब’ नमुने तपासणीसाठी पाठविले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Samples of a relative of the deceased patient in Washim have not been sent for investigation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.