Salary delays; Education Director's letter throw in dustbin | वेतनास विलंब; शिक्षण संचालकांच्या पत्राला केराची टोपली 
वेतनास विलंब; शिक्षण संचालकांच्या पत्राला केराची टोपली 

वाशिम: शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा १ तारखेलाच करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने २ आॅगस्ट २०१९ रोजी दिले होते. या निर्देशाची अद्याप अंमलबजावणी नसून वेतनास दिरंगाई करणाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने १३ आॅगस्ट २०१५ च्या परिपत्रकानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला अदा करण्याबाबत स्पष्ट सुचना दिल्या आहेत. तथापि, बहुतांश जिल्ह्यात शिक्षकांचे वेतन नियमितपणे १ तारखेला होत नसल्याबाबत शिक्षकांचे लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना आदिंकडून शासनास तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २ आॅगस्ट २०१९ रोजी एक परिपत्रक काढले होते. त्यानुसार शिक्षण संचालकांनी पत्र पाठवून शिक्षकांचे वेतन १ तारखेलाच अदा करण्याच्या सुचना शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाºयांना दिल्या होत्या. तथापि, पश्चिम वºहाडातील एकाही जिल्ह्यात दरमहा १ तारखेस वेतन अदा होत नाही. यामुळे शिक्षक व शिक्षक संघटनांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
 

वाशिम जिल्ह्यात निर्धारित वेळेवरच शिक्षक, शिक्षकेतरांना वेतन अदा करण्याचा प्रयत्न केला जातो. या संदर्भात गटशिक्षणाधिकाºयांकडून विहित मुदतीत प्रस्तावही मागितले जातात.
-अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद, वाशिम

Web Title: Salary delays; Education Director's letter throw in dustbin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.