३१ मार्चपासून बीएस-फोर वाहनांची नोंदणी होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 04:47 PM2020-03-02T16:47:53+5:302020-03-02T16:48:00+5:30

३१ मार्चनंतर बीएस फोर मानांकन असलेल्या वाहनांची नोंदणी केली जाणार नाही.

Registration of BS-Four vehicles will be closed from March 7 | ३१ मार्चपासून बीएस-फोर वाहनांची नोंदणी होणार बंद

३१ मार्चपासून बीएस-फोर वाहनांची नोंदणी होणार बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीएस-फोर मानांकन असलेल्या वाहनांची नोंदणी ३१ मार्चपर्यंतच होणार असून, त्यानंतर केवळ बीएस-सिक्स वाहनांची नोंदणी होणार आहे.  बीएस-फोर वाहनांची नोंदणी प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत २० मार्च २०२० पूर्वी पूर्ण करावी, असा इशारा आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी २ मार्च रोजी दिला.
बीएस-फोर मानांकन असलेल्या वाहनांचे नोंदणी शुल्क, कर यांचा भरणा केलेला असला तरीही ३१ मार्चनंतर बीएस फोर मानांकन असलेल्या वाहनांची नोंदणी केली जाणार नाही. फायनान्स कंपन्यांकडील थकीत प्रकरणे, वाहन मालकाचे आजारीपण, वाहन मालकाचा अपघात अशा कारणास्तव नोंदणी करावयाची प्रलंबित असलेल्या बी.एस. फोर वाहनांची नोंदणी प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत २० मार्च २०२० पूर्वी पूर्ण करावी लागणार आहे. संगणकीय वाहन नोंदणी प्रणालीवर ३१ मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीत बीएस-फोर वाहनांची नोंदणी होणार नाही. संबंधित वाहनधारकांनी याची दक्षता घेऊन तातडीने वाहन नोंदणी करून घ्यावी, अशा सूचना समरीन सय्यद यांनी दिल्या.
 
गुढी पाडव्याच्या वाहन खरेदीची प्रक्रिया अगोदरच पूर्ण करा
यंदा २५ मार्चला गुढी पाडवा आहे. या मुहूर्तावर वाहन खरेदी करू इच्छिणाºयांनी किमान ६ ते ७ दिवस अगोदर आपल्या वाहनाचे शुल्क, कराचा भरणा करावा. जेणेकरून एचएसआरपी नंबर प्लेट बसवून वितरक आपणाला गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर २५ मार्च रोजी वाहन देवू शकतील. ३१ मार्चनंतर आलेल्या किंवा विक्री झालेल्या एकाही बी. एस. फोर वाहनाची नोंदणी होणार नाही, असे समरीन सय्यद यांनी सांगितले.

Web Title: Registration of BS-Four vehicles will be closed from March 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.