पीककर्जाचा भरणा करण्यासाठी बँकांसमोर रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 11:20 AM2020-03-31T11:20:23+5:302020-03-31T11:20:34+5:30

पीककर्जाचा भरणा करण्यासाठी तसेच अन्य बँकिंग कामासाठी ३० मार्च रोजी बँकांसमोर नागरिकांच्या रांगा दिसून आल्या.

Queue in front of the banks to pay the loan | पीककर्जाचा भरणा करण्यासाठी बँकांसमोर रांगा

पीककर्जाचा भरणा करण्यासाठी बँकांसमोर रांगा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले. संचारबंदी लागू असल्याने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात आहे. तथापि, पीककर्जाचा भरणा करण्यासाठी तसेच अन्य बँकिंग कामासाठी ३० मार्च रोजी बँकांसमोर नागरिकांच्या रांगा दिसून आल्या.
जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही संशयित अथवा बाधित रुग्ण आढळलेला नाही. तथापि, सावधगिरीचा प्रयत्न म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे शासन आदेशाची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. संचारबंदी आदेश लागू असल्याने जमाव करण्यास मनाई आहे. वाशिम शहरात संचारबंदी आदेशाचीही कठोर अंमलबजावणी सुरू आहे.परंतू, पीककर्जाचा भरणा करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च असल्याने आणि त्यानंतर पीककर्जाचा भरणा केल्यास व्याजाचा भुर्दंड बसणार असल्याने पीककर्जाचा भरणा करण्यासाठी बँकांसमोर नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र ३० मार्च रोजी वाशिम शहरासह ग्रामीण भागात दिसून आले. अत्यावश्यक सेवेच्या दुकानांजवळ विशिष्ट अंतरावर वर्तुळ रंगविले असून, तेथे नागरिकांना उभे राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाशिम शहरातील बहुतांश बँकांसमोर विशिष्ट अंतरावर वर्तुळ रंगविण्यात आले नाही. त्यामुळे एका मागोमाग एक असे नागरीक उभे असल्याचे ३० मार्च रोजी दिसून आले. कोरोना विषाणूचा संसर्ग हा एकापासून दुसऱ्याला होत असल्यामुळे नागरिकांनीदेखील स्वत:हून काळजी घेऊन गर्दी होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. परंतू, काही नागरिक याबाबत गंभीर नसल्याचे बँकांसमोरील व बँकांमधील गर्दीवरून दिसून येते. दरम्यान बँकांमध्ये गर्दी होणार नाही, याची खबरदारी म्हणून ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमाची बँकांमध्ये अंमलबजावणी होणे आवश्यक ठरत आहे.


रिसोड येथे ‘सोशल डिस्टन्सिंग’चा नियम अंमलबजावणी नाही
रिसोड : पीककर्जाचा भरणा करण्यासाठी रिसोड येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत ३० मार्च रोजी शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली होती. बँकेत कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता नागरिकांची गर्दी झाल्याने ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमाचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन तालुका प्रशासनातर्फे केले जात आहे. तथापि पीककर्जाचा भरणा करण्याची मुदत जवळ आल्याने आणि मागील दोन दिवस बँका बंद असल्याने ३० मार्च रोजी बँकांमध्ये गर्दी झाल्याचे दिसून आले.


मेडशी येथे शेतकºयांची गर्दी
मेडशी : येथील दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेमध्ये चालू पीक कर्ज भरण्यासाठी ३० मार्च रोजी श्ेतकºयांची एकच गर्दी झाली होती. शासनाने थकीत शेतकºयांसाठी कर्जमुक्ती योजना तर चालू कर्जदारांना प्रोत्साहन देण्यासाठीा चालू कर्ज भरणे बंधनकारक आहे. सध्या कोरोना विषाणूच्या पृष्ठभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू आहे. परंतू, पीककर्जाचा भरणा केला नाही तर व्याजाचा भुर्दंड बसेल आणि प्रोत्साहनपर लाभही मिळणार नाही, या भीतीपोटी कोरोना विषाणू संसर्गाच्या आपत्कालिन परिस्थितीतही मेडशी येथे पीककर्जाचा भरणा करण्यासाठी शेतकºयांनी जिवाची पर्वा न करता ३० मार्च रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर गर्दी केली होती. बँकेसमोर विशिष्ट अंतरावर वर्तुळ रंगविले असून, या वर्तुळात शेतकरी उभे राहून नियमाचे पालन करीत असल्याचेही दिसून आले. कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी गजानन टाले यांनी यावेळी बंदोबस्त ठेवला. मेडशी येथील २६३ शेतकरी, खैरखेळा १३४, वारंगी ३४, पांगराबंदी १०१, सुदी ६४, भौरद ४०, राजुरा १०६, देवठाणा खांब ७९, ब्राम्हणवडा १५७, मारसुळ १४०, अशाप्रकारे १११७ चालू कर्जदार शेतकरी आहेत.

Web Title: Queue in front of the banks to pay the loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.