जनसेवा हेच समता फाऊंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट- पुरुषाेत्तम अग्रवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 07:54 PM2021-06-12T19:54:53+5:302021-06-12T19:55:00+5:30

Lokmat Interview : समता फाऊंडेशनचे अध्यक्ष पुरुषाेत्तम अग्रवाल यांची लाेकमतने मुलाखत घेतली असता जनसेवा हेच फाऊंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

Public service is the main objective of Samata Foundation - Purushattam Agarwal | जनसेवा हेच समता फाऊंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट- पुरुषाेत्तम अग्रवाल

जनसेवा हेच समता फाऊंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट- पुरुषाेत्तम अग्रवाल

Next

वाशिम  : शहरातील ३० हजार नागरिकांना काेराेनाची लस देण्याचा संकल्प केलेल्या समता फाऊंडेशनचे अध्यक्ष पुरुषाेत्तम अग्रवाल यांची लाेकमतने मुलाखत घेतली असता जनसेवा हेच फाऊंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

समता फाऊंडेशनचा मुळ उद्देश काेणता?
समता फाऊंडेशनचा मुळ उद्देश जनसेवा आहे. गाेर गरिबांना मदत, सर्वसामान्यांना आराेग्य सेवा मिळावी या प्रयत्न नेहमी फाऊंडेशनचा राहताे. काेणत्याही प्रकारे जनसेवा घडविण्याचे प्रमुख उद्देश फाऊंडेशनचा आहे.
काेराेना लसिकरणाचा उपक्रमाबाबत काय सांगाल ?
संपूर्ण जगात हाहाकार माजविणाऱ्या काेराेनाने सर्व क्षेत्रावर परिणाम केला. यावर एकमेव उपाय म्हणजे लसिकरण हाेय. हीच बाब हेरुन शहरातील नागरिकांचे लसिकरण करण्याचा निर्णय घेतला. तसेच लसिकरणाच्या दुसऱ्या डाेसबाबतही आपण सकारात्मक असून शासनाच्या अधिन राहून तेही कार्य पूर्ण करण्याचा आपला मानस आहे.


लहान मुलांच्या लसिकरणाबाबत काही भूमिका आहे का?
मुलाच्या लसीकरणाबाबत माझी भूमिका सकारात्मक असून अजून लसी बत लहान मुलावर प्रयोग सुरू आहे . शासनाची मान्यता मिळाल्यानंतर लहान मुलांनाही लस देण्याबाबत माझा मानस आहे . माझी प्रबळ इच्छाशक्ती आहे परंतु शासनाचे धोरण काय असणार यावर ते अवलंबून राहणार आहे .

समता फाउंडेशनचे रोपटे कसे वृद्धिंगत झाले ?
३५ वर्षांपूर्वी समता फाउंडेशन या नावाने बीज रोपण केलं आणि जनसेवा या उद्देशाने नेत्रदान यासाठी प्रथम पाऊल टाकलं आणि लाखो लोकांचे नेत्रशस्त्रक्रिया करण्याचं मला भाग्य मिळाले.  आणि पुढेही समता फाउंडेशन सामान्यांची सेवा करणे हाच  उद्देश असून त्यासाठी मी अहो रात्र प्रयत्न करणार . सर्वात प्रथम सर्वांचे लसीकरण करणे , त्याकरिता नागरिकांना प्रवृत्त करणे.  ४०० गावामध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करणे हे आमचे सध्याचे ध्येय आहे . तसेच जनकल्याणासाठी माझ्याकडे भरपूर संकल्पना असून त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे .

लसिकरणाबाबत नागरिकांना काय आवाहन कराल?
कारेाेनावर एकमेव उपाय म्हणजे लसिकरण हाेय. प्रत्येक नागरिकाने लसिकरण करावे व ईतरांनाही करण्यास सांगावे असे आवाहन मी करताे.

Web Title: Public service is the main objective of Samata Foundation - Purushattam Agarwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.