कक्ष अधिकारी, सहायक प्रशासन अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:02 PM2020-07-14T17:02:28+5:302020-07-14T17:02:44+5:30

पदोन्नतीस कर्मचारी पात्र असतानाही मार्च २०१५ पासून पदोन्नतीची कार्यवाही करण्यात आली नाही.

Promotions of cell officers, assistant administration officers stalled | कक्ष अधिकारी, सहायक प्रशासन अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या

कक्ष अधिकारी, सहायक प्रशासन अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या

Next

वाशिम : गत तीन वर्षांपासून अमरावती विभागातील विस्तार अधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी यासह वर्ग तीनच्या संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांना सहायक गटविकास अधिकारी म्हणून पदोन्नती मिळालेली नाही. अन्य विभागातील कर्मचाºयांना पदोन्नती मिळाली असून, अमरावती विभागातील कर्मचाºयांवरच अन्याय का? असा प्रश्न उपस्थित करीत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी महासंघाने महिला व बालविकास मंत्र्यांसह ग्रामविकास विभागाकडे धाव घेतली.
अमरावती विभागातील जिल्हा परिषदांमध्ये वर्ग तीनमध्ये कार्यरत विविध संवर्गातील कर्मचाºयांमधून शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणात महाराष्ट्र विकास सेवा यामध्ये सहायक गटविकास अधिकारी या पदावर पदोन्नती दिली जाते. अमरावती विभागात सहायक गटविकास अधिकारी ही पदे रिक्त असताना तसेच पदोन्नतीस कर्मचारी पात्र असतानाही मार्च २०१५ पासून पदोन्नतीची कार्यवाही करण्यात आली नाही. विहित वेळेत पदोन्नतीची कार्यवाही न झाल्याने ४ ते ५ कर्मचारी सेवानिवृत्तही झाले. पर्यायाने त्यांच्यावर अन्याय झाला. राज्यातील अन्य विभागात पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली असून, अमरावती विभागातच प्रशासकीय दिरंगाई का? असा प्रश्न महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने निवेदनाद्वारे उपस्थित केला.सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यातच चार, पाच वर्षाचा कालावधी जात असल्याने पदोन्नतीस पात्र असलेल्या कर्मचाºयांमधून रोष व्यक्त होत आहे. पदोन्नतीची प्रक्रिया लवकरात लवकर निकाली काढावी, अशी मागणीही महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी महासंघाने १४ जुलै रोजी केली.

Web Title: Promotions of cell officers, assistant administration officers stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.