प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना; नाव नोंदणी शिबिराची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 05:58 PM2019-08-25T17:58:37+5:302019-08-25T18:00:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम :प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेसाठी नाव नोंदणी सुरू असून, रविवारी वाशिम जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी शिबिराला ...

Prime Minister's Farmer's Honor Scheme; Inspection of Name Registration Camp by Collector | प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना; नाव नोंदणी शिबिराची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना; नाव नोंदणी शिबिराची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेसाठी नाव नोंदणी सुरू असून, रविवारी वाशिम जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी शिबिराला भेट दिल्या.
प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात २२ ते २५ ऑगस्ट 4रम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील १८ ते ४० वयोगटातील सर्व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र असून सामाईक सुविधा केंद्रावर नोंदणी केली जात आहे. २५ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी मोडक यांनी मानोरा, वाशिम, कारंजा, मंगरूळपीर तालुक्यातील शिबिराला भेटी दिल्या. १ आॅगस्ट २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे वय असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. नोंदणीनंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून लाभार्थी हिश्याची रक्कम आॅटो-डेबीटने विमा कंपनीकडे जमा होईल. नाव नोंदणीसाठी शेतकºयांनी आधारकार्ड, ८ अ व बँक पासबुक, बँक खाते क्रमांक, जन्म तारखेचा पुरावा, पत्नीचे नाव इत्यादी माहिती सोबत आणणे आवश्यक आहे.

Web Title: Prime Minister's Farmer's Honor Scheme; Inspection of Name Registration Camp by Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम