ट्रॅक्टर अपघातात एक ठार, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:05 AM2020-06-05T11:05:11+5:302020-06-05T11:05:20+5:30

ट्रॅक्टरची टॉली उलटून एक जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना ४ जून रोजी घडली.

One killed, three injured in tractor accident | ट्रॅक्टर अपघातात एक ठार, तीन जखमी

ट्रॅक्टर अपघातात एक ठार, तीन जखमी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : गोवर्धन-पेनबोरी रस्त्यावर विजेचे खांब घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची टॉली उलटून एक जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना ४ जून रोजी घडली. आकाश ब्रह्मदत्त चव्हाण ( वय २२) रा.पेडगाव ता.मंगरुळपीर असे मृतकाचे नाव आहे.
विद्युतविषयक काम करणाºया कंत्राटदाराचे एम. एच. ३७ एफ १४३५ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये आठ विजेचे खांब घेऊन हे काही जण ४ जून रोजी सकाळी १० वाजता दरम्यान रिसोड तालुक्यातील पेनबोरीकडे जात होते. गोवर्धना ते पेनबोरी दरम्यान ट्रक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टॉली उलटुन अपघात झाला. या अपघातात आकाश ब्रह्मदत्त चव्हाण याच्या अंगावर ट्रॅक्टरमधील विजेचे खांब पडल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर अपघातात तीन जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार वाठोरे यांनी गोवर्धन पोलीस चौकीचे इन्चार्ज दामोदर ईप्पर यांना घटनास्थळावर पाठविले. त्यांनी जखमींना उपचारासाठी अकोला येथे दवाखान्यात पाठविले.

Web Title: One killed, three injured in tractor accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.