दावेदारांना प्रतिक्षा अधिकृत घोषणेची; इच्छुकांना वर्णीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 01:54 PM2019-09-23T13:54:48+5:302019-09-23T13:55:06+5:30

भाजप-सेना युतीचा निर्णय आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची अद्याप घोषणाच केली नाही.

The official declaration of waiting for the claimants; Contribute to the aspirants | दावेदारांना प्रतिक्षा अधिकृत घोषणेची; इच्छुकांना वर्णीची

दावेदारांना प्रतिक्षा अधिकृत घोषणेची; इच्छुकांना वर्णीची

Next

- दादाराव गायकवाड  
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि निवडणूक कार्यक्रमही निवडणूक आयोगाने जाहिर केला. तथापि, भाजप-सेना युतीचा निर्णय आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची अद्याप घोषणाच केली नाही. त्यामुळे संभाव्य दावेदारांना अधिकृत घोषणेची, इच्छुकांनाही तिकिटासाठी वर्णी लागण्याची प्रतीक्षा लागली असल्याचे चित्र कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघात पाहायला मिळत आहे. दरम्यान, राजकीय पक्षांनी अधिकृत घोषणा केली नसली तरी, संभाव्य दावेदार आणि इच्छुकांनी नेत्यांच्या गाठीभेटी वाढविल्या आहेत.
गतवेळच्या निवडणुकीत कारंजा-मानोरा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेेंद्र पाटणी यांनी ऐन निवडणूकपूर्वी भाजपात प्रवेश करून विजय मिळविला. त्यावेळी सेना, भाजपाची युती न झाल्याने त्यांना भाजपाच्या अधिकृत तिकिटावर निवडणूक लढविता आली, तर सेनेलाही आपला अधिकृत उमेदवार उभा करता आला; परंतु आता लोकसभेत युती करणाऱ्या भाजपा-सेनेत विधानसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपाचा मुद्दा कळीचा ठरत आहे. त्यामुळे युतीचा निर्णय रखडला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही गतवेळची निवडणूक स्वतंत्र लढविली होती; परंतु आता या दोन्ही पक्षाची पुन्हा आघाडी होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. काँगे्रस-राष्ट्रवादीच्या आघाडीत कारंजा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. निर्णयाअभावी उमेदवाराची घोषणा मात्र रखडली आहे. दुसरीकडे भाजपा-सेना युती झाली, तर पूर्वी सेनेकडे असलेला कारंजा मतदारसंघ भाजपा सोडणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. सेना हा मतदारसंघ सोडण्यास तयार नसल्याचे किंबहुना या मतदारसंघावर सेनेने दावा केल्याचे दिसत असून, अशाच काही मतदारसंघांमुळे युतीचा निर्णय अधांतरी आहे. या निर्णयाअभावी दोन्ही पक्षांच्या दावेदारांचा जीव टांगणीला लागला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी अपेक्षीत असली तरी, उमेदवारांची घोषणा रखडल्याने या पक्षातील दावेदारांनाही ती प्रतिक्षा लागली आहे. वंचित बहुजन आघाडीचे चित्र यापेक्षाही वेगळे आहे. ऐन विधानसभा निवडणूकीपूर्वी वाटाघाटीसह इतर मुद्यांवरून भारीप-बमसं आणि एमआयएमचे फिस्कटले. त्यात गतवेळच्या निवडणुकीत दुसºया क्रमांकाची मते घेणाºया भारीपकडून अर्थात वंचित बहुजन आघाडीकडून लढण्याची इच्छा अनेकजण बाळगून आहेत. तथापि, अद्याप एमआयएम आणि भारीप या दोन्ही पक्षाच्या काडीमोडाची अधिकृत घोषणा झालेली नसून, पक्ष सोबत असले तरी, त्यांनीही कारंजासाठी उमेदवाराची घोषणा केली नाही. त्यामुळे वचिंतकडून विधानसभा लढविण्यास इच्छूक असलेल्यांची घालमेल सुरू असून, सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी आपापल्या स्तरावर गाठीभेटी वाढविल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


तयारी सेना आणि भाजपाचीही
विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपा युती होणार की नाही, हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. कारंजात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तथापि, २०१४ पूर्वीच्या वाटाघाटीनुसार सेना या मतदारसंघावर आग्रही असल्याने सेनेच्या इच्छुकांची तयारी जोरात आहे. सद्य:स्थितीत भाजपाकडे हा मतदार संघ असल्याने भाजपाकडूनही निवडणुकीची तयारी जोरातच आहे.

 

Web Title: The official declaration of waiting for the claimants; Contribute to the aspirants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.