नुकसानग्रस्त शेतीच्या पाहणीसाठी पालकमंत्र्यांसह आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 04:46 PM2019-11-02T16:46:58+5:302019-11-02T16:47:48+5:30

त्यक्ष पाहणी करायला जाण्यापुर्वी सरकारी अधिका-यांशी चर्चा करून कारंजा व मानोरा तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला.

MLA along with Guardian Ministers, look into the damaged crop | नुकसानग्रस्त शेतीच्या पाहणीसाठी पालकमंत्र्यांसह आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर

नुकसानग्रस्त शेतीच्या पाहणीसाठी पालकमंत्र्यांसह आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा/मानोरा  : वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री तथा महसुल राज्य मंत्री संजय राठोड यांनी २ नोव्हेंबर रोजी कारंजा व मानोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी शेतकºयांच्या शेतात जावून केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजेंद्र पाटणी यांच्या सह  अधिकाºयांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष शेतकºयांच्या बांधावर जाउन नुकसान ग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकºयांच्या व्यथा जानून घेतल्या.
सततच्या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुसान झाले. या नुसान भरपाई साठी शासन दरबारी आपण सर्वतोपरी प्रर्यत्न करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. २ नोव्हेबर रोजी सकाळी ८ वाजता कारंजा येथील शासकीय विश्राम गृहात प्रत्यक्ष पाहणी करायला जाण्यापुर्वी सरकारी अधिका-यांशी चर्चा करून कारंजा व मानोरा तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी अनुप खांडे , तहसिलदार धिरज माजंरे, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पाटील, ठाणेदार सोमनाथ जाधव, जिल्हा कृषीअधिक्षक शंकर तोटावार, तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके, तलाठी संदीप यांच्या सह तहसील कार्यालयातील महसुल विभागाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती. त्यानतंर त्यानी कारंजा तालुक्यातील काळी कांरजा, गिर्डा  शेतशिवारात जावून नुकसान ग्रस्त पिकांची पाहणी केली.
तसेच  मानोरा तालुक्यातील  वाईगोळसह इंझोरी, दापुरा, भोयणी, कुपटा, हातना,  आदि बाधीत क्षेत्राला भेट देवुन पाहणी केली. यासाठी शासनाने दखल घेत नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामा व सर्वेक्षण करण्याकरिता प्रशासनाला आदेश दिले आहे. नुकसानग्रस्त क्षेत्रांची पाहणी पालकमत्री संजय राठोड व  राजेंद्र पाटणी यांनी शेतशिवार गाठुन  मोका पाहणी केली.य् ाावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी अनुप खाडे, तहसीलदार डॉ. सुनिल चव्हाण, कृषी अधिकारी उपस्थित होते.
 
पिक विमा धारक  शेतकºयांनी  अर्ज सादर करण्याचे आवाहन
मानोरा तालुक्यात एकुण ५५ हजार शेतकºयांनी पंतप्रधान पिक विमासाठी अर्ज सादर केला आहे, परंतु त्यापैकी ४१ हजार शेतकºयानी पिक विमा अर्ज कृषी अधिकारी याकडे दाखल केले आहे. उर्वरीत सर्वत्र शेतकºयानी पिक विमा मागणीसाठी कृषी अधिकाºयाकडे अर्ज सादर करावा अशी माहिती आ. राजेंद्र पाटणी व भाजपा पदाधिकारी माजी जि.प.अध्यक्ष अरविंद पाटील यांनी दिली आहे.0

Web Title: MLA along with Guardian Ministers, look into the damaged crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.