राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:45 AM2021-03-09T04:45:33+5:302021-03-09T04:45:33+5:30

राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेश आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला, शेतकरी, व्यापारी, कामगार यासह सर्वच घटकांसाठी या अर्थसंकल्पात ठोस तरतूद ...

Mixed reaction to state budget! | राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया!

राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया!

Next

राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेश आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला, शेतकरी, व्यापारी, कामगार यासह सर्वच घटकांसाठी या अर्थसंकल्पात ठोस तरतूद करण्यात आली आहे. एकंदरीत हा अर्थसंकल्प दिलासादायक आहे.

- अ‍ॅड. किरणराव सरनाईक,

आमदार

००

व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून राज्याचा अर्थसंकल्प हा ‘फिफ्टी-फिफ्टी’ म्हणावा लागेल. काही निर्णय व्यापाऱ्यांसाठी चांगले असले तरी काही बाबतीत दिलासा मिळणे अपेक्षित होते.

- आनंद चरखा

जिल्हाध्यक्ष, युवा व्यापारी मंडळ वाशिम

०००

शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के दराने यासह विद्यार्थी, आरोग्य, शिक्षण, व्यापार, महिला, सिंचन, रस्ते निर्मिती यासह विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न राज्याचा अर्थसंकल्पातून झाला आहे.

- अमित झनक

आमदार

०००

राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, व्यापारी, विद्यार्थ्यांसाठी ठोस असे काहीच नाही. कोरोनामुळे व्यापार क्षेत्र ढवळून निघाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांसाठी काहीतरी नवीन तरतूद होईल, अशी अपेक्षा होती.

- लखन मलिक,

आमदार

०००

राज्याच्या अर्थसंकल्पाने राज्यातील समस्त जनतेचा भ्रमनिरास केला आहे. शेतकऱ्यांसह व्यापारी, महिला, आरोग्याच्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पात ठोस काहीच नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे.

- राजेंद्र पाटणी,

आमदार

००

राज्याच्या अर्थसंकल्पाने महिला, शेतकऱ्यांसह सर्वच क्षेत्रांला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात १ टक्के सवलत देऊन महिलांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.

भावना गवळी

खासदार

Web Title: Mixed reaction to state budget!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.