महाराष्ट्राची संस्कृती जाणून घेण्यासाठी 'हा' अवलिया करतोय १६ वर्षांपासून राज्यभर भ्रमंती!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:42 PM2019-09-16T12:42:35+5:302019-09-16T12:47:50+5:30

पुण्यातील नंदकुमार बर्गे नामक एक युवक गत १६ वर्षांपासून दुचाकीने दरवर्षी एका जिल्ह्याची भ्रमंती करून महाराष्ट्राची संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करित आहे.

Learn about the culture of Maharashtra youth on travel for16 years! | महाराष्ट्राची संस्कृती जाणून घेण्यासाठी 'हा' अवलिया करतोय १६ वर्षांपासून राज्यभर भ्रमंती!

महाराष्ट्राची संस्कृती जाणून घेण्यासाठी 'हा' अवलिया करतोय १६ वर्षांपासून राज्यभर भ्रमंती!

googlenewsNext

वाशिम : ‘जय महाराष्ट्र’, ‘माझा महाराष्ट्र’, असे म्हणत असताना अनेकांना स्वत:च्या जिल्ह्याशिवाय अन्य जिल्ह्यांची साधी माहिती देखील नसते. हीच बाब खटकल्याने पुण्यातील नंदकुमार बर्गे नामक एक युवक गत १६ वर्षांपासून दुचाकीने दरवर्षी एका जिल्ह्याची भ्रमंती करून महाराष्ट्राची संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करित आहे. यंदा त्यांनी गणेशोत्सवात वाशिम जिल्ह्यातील गावांना भेट देऊन महाराष्ट्र भ्रमंतीची १६ वी फेरी पूर्ण केली.

१०४ लघू चित्रपट निर्मिती करणारे तसेच ३६२३ एकपात्री प्रयोगांमध्ये सहभागी होऊन नागरिकांचे मनोरंजन करणाऱ्या नंदकुमार बर्गे हे आपल्या दुचाकी वाहनाने दरवर्षी महाराष्ट्रातील एका जिल्ह्याला भेट देऊन तेथील संस्कृती जाणून घेतात. दिवसभर पर्यटन आणि रात्रीच्या वेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या परवानगीने विनोदी कार्यक्रम करण्याची संधी मिळाल्यास त्यामाध्यमातून मिळणाºया मानधनातून प्रवासखर्च भागविला जातो, असे बर्गे सांगतात. त्यांचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरावा, असाच आहे.
 
सामाजिक विषयांवर जनजागृती!

दरवर्षी दुचाकी वाहनाने महाराष्ट्रातील एका जिल्ह्याची भ्रमंती करण्याची परंपरा नंदकुमार बर्गे यांनी यंदाच्या १६ व्या वर्षीही कायम ठेवली आहे. प्रवासादरम्यान स्त्री भ्रूण हत्या, वृक्षलागवड, नेत्रदान, रक्तदान, अवयवदान यासह अन्य सामाजिक विषयांवर ते प्रबोधन करतात.

Web Title: Learn about the culture of Maharashtra youth on travel for16 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.