पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:35 PM2020-02-11T12:35:53+5:302020-02-11T12:36:02+5:30

शेतातील विहिरीत पोहायला गेलेल्या २२ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Karanja : swimming youth drowned in Well | पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : कारंजा-मुर्तीजापूर रस्त्यावर असलेल्या शेतातील विहिरीत पोहायला गेलेल्या २२ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवार, १० फेब्रूवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, कारंजा शहरातील जयस्तंभ चौक परिसरात वास्तव्यास असलेला आकाश प्रकाश चौकसे हा युवक त्याच्या काही मित्रासोबत कारंजा-मुर्तीजापूर रस्त्यावर असलेल्या शेतातील विहिरीत पोहायला गेला होता. यादरम्यान तो पाण्यात खोलवर बुडाला.
घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन संस्थेचे विजय भिसे, श्याम सवाई, विजय गागरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आकाशचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून कारंजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Karanja : swimming youth drowned in Well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.