वाशिम  जिल्ह्यात १० हजार शेतकऱ्यांना विम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 12:01 PM2020-01-19T12:01:35+5:302020-01-19T12:01:42+5:30

१० हजार ६४ शेतकऱ्यांना अ‍ॅग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनीकडून ८१ लाख ४१ हजार ८८ रुपयांची नुकसान भरपाई पीकविम्यापोटी देण्यात आली.

Insurance benefit to 10,000 farmers in Washim district | वाशिम  जिल्ह्यात १० हजार शेतकऱ्यांना विम्याचा लाभ

वाशिम  जिल्ह्यात १० हजार शेतकऱ्यांना विम्याचा लाभ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात अवेळी पावसामुळे खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानापोटी उडिद आणि मुग या पिकाचा विमा भरणाºया १० हजार ६४ शेतकऱ्यांना अ‍ॅग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनीकडून ८१ लाख ४१ हजार ८८ रुपयांची नुकसान भरपाई पीकविम्यापोटी देण्यात आली असून, शेतकºयांच्या खात्यात पीकविम्याची रक्कमही जमा करण्यात येत आहे.
वाशिम जिल्ह्यात गतवर्षी आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने थैमान घालत शेतीपिकांचे अतोनात नुकसान केले. यात पीक विमा भरणाºया शेतकºयांच्या नुकसानाची पाहणी प्रशासनातर्फे करण्यात आली आणि कृषी विभागाने या संदर्भातील अहवाल कृषी आयुक्त पुणे यांच्याकडे पाठविला होता. जिल्ह्यात गतवर्षीच्या अर्थात २०१९च्या खरीप हंगामात २ लाख ९५ हजार २९० शेतकºयांनी २ लाख ४ हजार १०० हेक्टर क्षेत्रासाठी १७ कोटी ६२ लाख ९३ हजार २१४ रुपये पिकविम्यापोटी भरले होते. त्यात अवेळी पावसामुळे झालेल्या पीकविमा मंजूर होण्याच्या मागणीसाठी ८६ हजार ४३ शेतकºयांनी पीक विम्यापोटी नुकसानभरपाई मिळण्यासाठी अर्ज केले होते. या अर्जांच्या आधारे कृषी विभाग व पीक विमा कंपनीने नुकसानभरपाई म्हणून मदत देण्यासाठी केलेल्या आकडेमोडीनुसार अंदाजे ३६९ कोटी ९८ लाख ४९ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान, जिल्ह्यातील २७ हजार २४ शेतकºयांनी १२ हजार ५१९ हेक्टर क्षेत्रातील उडिद आणि मुग या पिकांच्या विम्यापोटी ४७ लाख ५७ हजार ४४२ रुपये भरले होते. त्यापैकी १० हजार ६१ शेतकºयांना ८१ लाख ४१ हजार ८८ रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे.


खरिप हंगामात अवकाळी पावसामुळे मुग आणि उडीद पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानापोटी पीक विमा भरणाºया शेतकºयांना विम्याची रक्कम मंजुर झाली असून त्याचे वितरण थेट खात्यावर करण्यात येत आहे. तसे मॅसेजची पाठविले आहेत.
- ज्ञानेश्वर बोबडे
जिल्हा समन्वयक, कृषी पीक विमा कंपनी , वाशिम


भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्यावतिने पीक विमाधारक शेतकºयांना उडीद आणि मुग पिकांचे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी ८१ लाख ४१ हजार रुपयांची भरपाई मंजुर केली आहे. यासाठी दहा हजार ६१ शेतकरी पात्र असून त्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येत आहे.
- एस.एम. तोटावार
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,
वाशिम

 

Web Title: Insurance benefit to 10,000 farmers in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.