दवाखान्याची इमारत शिकस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:41 AM2021-01-23T04:41:51+5:302021-01-23T04:41:51+5:30

धनज बु.: कारंजा तालुक्यातील धनज बु. अंतर्गत येत असलेल्या राहाटी येथील आयुर्वेदिक दवाखान्याची दोन वर्षांपासून इमारत शिकस्त झाली आहे. ...

The hospital building collapsed | दवाखान्याची इमारत शिकस्त

दवाखान्याची इमारत शिकस्त

Next

धनज बु.: कारंजा तालुक्यातील धनज बु. अंतर्गत येत असलेल्या राहाटी येथील आयुर्वेदिक दवाखान्याची दोन वर्षांपासून इमारत शिकस्त झाली आहे. तथापि, या इमारतीच्या दुरुस्तीची दखल घेण्यात आली नाही. शिवाय प्रमाणात घाण, कचरा पसरला आहे.

---------

दीड एकर हरभरा वन्य प्राण्यांकडून उद्ध्वस्त

मेडशी: परिसरात सध्या रब्बी पिके डोलदार असून, हरिण, माकड आदी वन्य प्राणी पिकांत धुमाकूळ घालत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. त्यात गत तीन दिवसांत माकडे आणि हरणांच्या कळपांनी हरभरा पिकात हैदोस घालून एका शेतकऱ्याच्या शेतातील दीड एकर पीक फस्त केले. यामुळे शेतकरी हताश झाला असून, वन विभागाने दखल घेण्याची मागणी त्याने केली आहे.

-------

पोकरा अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

किन्हीराजा: ग्राम भोयनी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत (पोकरा) अंतर्गत शेती शाळेच्या आधारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. यात गुरुवारी किन्हीराजा परिसरात पोकरा प्रकल्पातील विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देतानाच रब्बी आणि फळपिकांवरील कीड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

------

हळदीवर करपा रोग

जऊळका:

मालेगाव तालुक्यातील जऊळका परिसरात आहे. त्यामुळे आधीच पिकावर विपरित परिणाम होऊन विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यात आता हळदीच्या पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे झाले आहे.

Web Title: The hospital building collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.