‘आम आदमी’तर्फे शेतकरीविरोधी विधेयकाची होळी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 04:07 PM2020-09-24T16:07:30+5:302020-09-24T16:07:37+5:30

शेतक-यांच्या शेतीमालाचे दर खासगी कंपन्यांना ठरवता येणार असून, आधारभूत किमतीची कोणतीही शाश्वती या विधेयकात दिली नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या पदाधिका-यांनी केला.

Holi of anti-farmer bill by 'Aam Aadmi' | ‘आम आदमी’तर्फे शेतकरीविरोधी विधेयकाची होळी

‘आम आदमी’तर्फे शेतकरीविरोधी विधेयकाची होळी

Next

उद्योगपतींच्या दबावाखाली येऊन केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेमध्ये तीन शेतकरीविरोधी विधेयके पारीत केल्याचा आरोप करीत आम आदमी पक्षाच्या पदाधिका-यांनी २४ सप्टेंबर रोजी वाशिम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात या विधेयकाची होळी केली.
केंद्र सरकारने एकूण तीन विधेयके पारित केली आहेत. यामध्ये शेतक-यांच्या शेतीमालाला बाजार समितीच्या बाहेर विकण्याची मुभा दिली. परंतु शेतक-याला मिळणा-या हमीभावाबाबत स्पष्ट उल्लेख केला नाही. यामुळे शेतक-यांच्या शेतीमालाचे दर खासगी कंपन्यांना ठरवता येणार असून, आधारभूत किमतीची कोणतीही शाश्वती या विधेयकात दिली नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या पदाधिका-यांनी केला.

आवश्यक वस्तू कायद्यात बदल करीत खासगी व्यापा-यांना काळाबाजार करण्याची वाट मोकळी करण्यात आली आहे. यामुळे मध्यमवर्गाला महागाईचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. तसेच 'मूल्य आश्वासन व कृषी सेवा शेतकरी (सशक्तीकरण आणि संवर्धन) करार' या कायद्याद्वारे शेतकरी व खासगी कंपन्यांना कराराच्या माध्यमातून शेती करता येणार आहे. कराराच्या अटींमध्ये शेतक-यांना फसवून खासगी कंपन्यांद्वारे त्यांची पिळवणूक करणारा हा कायदा आहे, असा आरोप यावेळी पदाधिका-यांनी केला.

स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात या विधेयकांची होळी करीत ‘शेती विरोधी कायदे करणा-या, शेतीमालाला हमीभाव नाकारणा-या केंद्र सरकारचा धिक्कार असो' अशी घोषणाबाजी पदाधिका-यांनी केली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: Holi of anti-farmer bill by 'Aam Aadmi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.