रिठद येथे आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:44 AM2021-04-23T04:44:14+5:302021-04-23T04:44:14+5:30

0000 एटीएममध्ये सुविधांचा अभाव वाशिम : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील एटीएममध्ये अनेक ठिकाणी गर्दी असल्याचे चित्र दिसून ...

Health check-up at Rithad | रिठद येथे आरोग्य तपासणी

रिठद येथे आरोग्य तपासणी

Next

0000

एटीएममध्ये सुविधांचा अभाव

वाशिम : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील एटीएममध्ये अनेक ठिकाणी गर्दी असल्याचे चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी वॉचमन कार्यरत नसल्याने नागरिकांमध्ये धास्ती आहे. सॅनिटायझर तसेच निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्याची गरज आहे.

0000

मेडशी येथे आणखी चार रुग्ण

वाशिम : मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे आणखी चार जणांचा कोरोना चाचणी अहवाल २२ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केली.

००००

ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट

वाशिम : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहेत. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, पारंपरिक झाडू व्यवसाय करणारे अडचणीत आले आहेत. हाच प्रकार अन्य व्यवसायांबाबतही दिसून येत असून, ग्रामीण कारागीरसुद्धा अडचणीत आहेत.

000

सुरक्षाकवचाविना डीपी धोकादायक

वाशिम : तालुक्यात अनेक ठिकाणी वीज कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. वीज प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. यामुळे धोेक्याची शक्यता नाकारता येत नाही.

00000

कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याची मागणी

वाशिम : आधार लिंकिंग, अंगठ्याचा ठसा न घेणे व अन्य तांत्रिक कारणांमुळे कारंजा तालुक्यातील जवळपास ८० शेतकऱ्यांना महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला नाही. याकडे प्रशासन, शासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली.

000

पीकविम्यासाठी कृषी विभागाला निवेदन

वाशिम : गत हंगामात अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. तालुक्यातील अशा १४ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे मंगळवारी निवेदन सादर करून दखल घेण्याची मागणी केली.

0000

शासकीय समित्यांच्या गठनाची प्रतीक्षा!

वाशिम : संजय गांधी निराधार योजना यासह तालुकास्तरावर विविध समित्यांचे गठन अद्याप झाले नसल्याने या समित्यांचे गठन केव्हा होणार, याकडे लाभार्थींचे लक्ष लागून आहे.

00000

महावितरणकडून रोहित्रांची दुरुस्ती

वाशिम : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात जवळपास ३६ रोहित्रांची दुरुस्ती करण्यात आली. यामुळे गावकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे.

0000

४६८ घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित

वाशिम : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) वाशिम तालुक्यास ४६८ घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. अनु.जमाती ११ व इतर प्रवर्गातील ४६८ घरकुले आहेत. या घरकुलांची कामे सुरू झाली आहेत.

00

शेलूबाजार मार्गावर खड्डेच खड्डे

वाशिम : नागपूर ते मुंबई या महामार्गावरील मालेगाव ते शेलूबाजारदरम्यान खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. किन्हीराजानजीक रस्त्यावर पडलेला खड्डा जीवघेणा ठरत आहे.

000000

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी

वाशिम : शहरातील जुना रिसोड नाका, खामगाव जीन परिसरात अनेक मोकाट कुत्रे असून, ते नागरिकांना चावा घेण्याची शक्यता बळावली आहे. पाळीव जनावरांनाही ते जखमी करत आहेत.

000

तोंडगाव येथे पुन्हा एक रुग्ण

वाशिम : तालुक्यातील तोंडगाव येथे दैनंदिन रुग्ण आढळत असून, गुरुवारी आणखी एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Web Title: Health check-up at Rithad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.