गुरूमंदिर संस्थानच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी ‘फॉरेन्सिक आॅडिटर’मार्फत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 03:28 PM2019-07-17T15:28:22+5:302019-07-17T15:28:28+5:30

कारंजा लाड : कारंजा शहरातील प्रसिध्द गुरूमंदिर संस्थानच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्यासाठी नागपुर येथील अभिजीत केळकर अ‍ॅड कंपनी या फॉरन्सीक आॅडीटरची नियुक्ती विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केली आहे.

Gurumandir sansthan's financial transaction will be examined by the 'Forensic Auditor' | गुरूमंदिर संस्थानच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी ‘फॉरेन्सिक आॅडिटर’मार्फत होणार

गुरूमंदिर संस्थानच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी ‘फॉरेन्सिक आॅडिटर’मार्फत होणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : कारंजा शहरातील प्रसिध्द गुरूमंदिर संस्थानच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्यासाठी नागपुर येथील अभिजीत केळकर अ‍ॅड कंपनी या फॉरन्सीक आॅडीटरची नियुक्ती विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केली आहे. कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हाच्या अनुषंगाने ही तपासणी पूर्ण होणार आहे. कारंजा येथील समाजसेवक शेखर काण्णव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपिठात गुरूमंदिर संस्थान विश्वस्तांविरूध्द दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने सदर नियुक्ती झाली असल्याची माहिती शेखर काण्णव यांनी १४ जुलै रोजी दिली.
सविस्तर असे की, विश्वस्ताच्या विरोधात शहर पोलीस स्टेशन येथे ३१ मे २०१६ रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हा रद्द करण्यात यावा म्हणुन गुरूमंदीर विश्वस्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपिठात याचिका दाखल केली होती. न्यायाधिशांनी २१ नोव्हेंबर २०१७ रोजी सदर अर्ज नांमजुर करून खारीज केला होता. त्यामुळे पोलीस तपासातील स्थगनादेश दुर झाला. तक्रारकर्ते शेखर काण्णव यांच्या अर्जानुुसार सदर प्रकरण आर्थिक गुन्हा शाखा वाशिम यांच्याकडे तपासण्याकरीता वर्ग करण्यात आले. काण्णव यांनी तक्रारीमधील सर्व अंकेक्षण अहवालाचे पुनर्लेखांकन करून घेण्याची मागणी केली होती. १ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयान्वये आर्थीक गुन्हे प्रकरण तपासकामी सरकारमान्य फॉरेन्सीक आॅडीटर फर्मची नियुक्ती करणे गरजचे होते. जानेवारी, डिसेंबर २०१८ च्या कालावधीत काण्णव यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती, पोलीस अधिक्षक तथा उपअधिक्षक वाशिम यांना ७ लेखी पत्रे दिली. पुराव्याचे नविन दत्तावेज तयार केले. तरी सुध्दा पोलीस प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने काण्णव यांनी १८ जानेवारी २०१९ रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात वैयक्तीकरीत्या फौजदारी रिट अर्ज दाखल केला. त्यानुसार उपविभागीय अधिकारी रमेश सोनुने यांचे पत्रानुसार अभिजीत केळकर नागपुर या फॉरेन्सीक आॅडीटरची नियुक्ती करण्यात आली, अशी माहिती शेखर काण्णव यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

आमचा या ‘फॉरेन्सिक आॅडिट’सोबत काही संबंध येत नाही. या संदर्भात आम्हाला काही कल्पना नाही
- प्रकाश घुडे,
विश्वस्त
गुरुमंदिर संस्थान, कारंजा लाड

Web Title: Gurumandir sansthan's financial transaction will be examined by the 'Forensic Auditor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.