वाशिम जिल्ह्यात आणखी चौघांचा मृत्यू; ९२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:46 PM2020-10-17T12:46:19+5:302020-10-17T12:46:30+5:30

Coronavirus in Washim ४ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Four moreI death in Washim district; 92 new Corona positive patients | वाशिम जिल्ह्यात आणखी चौघांचा मृत्यू; ९२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

वाशिम जिल्ह्यात आणखी चौघांचा मृत्यू; ९२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  जिल्ह्यात १६  ऑक्टाेबर रोजी दिवसभरात ९२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५२४०  झाली आहे.  तसेच गेल्या काही दिवसांतील ४ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  दरम्यान २१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
१६ ऑक्टोबर रोजी दिवसभरात ९२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सारडा ले-आऊट परिसरातील १, महाकाली मंदिर परिसरातील १, समर्थ नगर येथील १, शासकीय वसाहत येथील ३, देवपेठ येथील १, लाखाळा येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १, भागडे हॉस्पिटल परिसरातील १, ब्राह्मणवाडी येथील १, नागठाणा येथील १, जांभरुण नावजी येथील १, काटा येथील १, कार्ली येथील १, कोंडाळा झामरे येथील १, मंगरूळपीर शहरातील संभाजी नगर येथील ६, जांब रोड परिसरातील १, मानोली रोड परिसरातील २, हिसई येथील १, बेलखेड येथील ३, इचा येथील १, पिंप्री येथील १, हिरंगी येथील १, सावरगाव येथील १, कासोळा येथील ७, पार्डी ताड येथील १, मानोरा तालुक्यातील अजनी येथील ४, इंझोरी येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. सोळा येथील १, वार्ड क्र. सतरा येथील ४, वार्ड क्र. बारा येथील २, वार्ड क्र. अकरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, शिरपूर जैन येथील ४, गिव्हा येथील १, आमखेडा येथील १, पांगरी कुटे येथील १, रिसोड शहरातील समर्थ नगर येथील १, धोबी गल्ली येथील १, बेले गल्ली येथील ३, बालाजी गल्ली येथील १, मुल्ला गल्ली येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, येवती येथील १, वाडी रायताळ येथील १, खडकी येथील १, भरजहांगीर येथील ३, कान्हेरी येथील २, नेतान्सा येथील १, सवड येथील २, हराळ येथील १, करडा येथील १, कारंजा लाड शहरातील कानडीपुरा येथील १, नगरपरिषद कॉलनी परिसरातील २, मोठे राममंदिर परिसरातील १, पहाडपुरा येथील १, कामरगाव येथील १, खेर्डा येथील १, शहा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

Web Title: Four moreI death in Washim district; 92 new Corona positive patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.