अडाण नदीला पूर; शेकडो एकर शेतात पाणी शिरल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 11:01 AM2020-07-18T11:01:37+5:302020-07-18T11:01:48+5:30

नदीच्या काठावर असलेल्या गावांतील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमिनीत पाणी घुसून त्याचे नुकसान झाले.

Flood the Adana river; Hundreds of acres of farmland damaged by floods | अडाण नदीला पूर; शेकडो एकर शेतात पाणी शिरल्याने नुकसान

अडाण नदीला पूर; शेकडो एकर शेतात पाणी शिरल्याने नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या अडाण नदीला १६ जुलै रोजी महापूर आला. यामुळे नदीच्या काठावर असलेल्या गावांतील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमिनीत पाणी घुसून त्याचे नुकसान झाले. या नुकसानाची पाहणी करून तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी शुक्रवारी केली.
गुरुवार १५ जुलै रोजी सकाळी ४ वाजतापासून जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे अडाण नदीला पूर आला. या पुरामुळे मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा, गणेशपूर, घोटा, पोघात, शिवणी रोड पारवा शिवारातील शेतजमिनीत पाणी शिरल्याने शेकडो एकर क्षेत्रातील एकर जमीनी खरडून गेल्या आहेत. यात सोयाबिन, तूर, कपासी, मुग, उडिद आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी
हवालदिल झाला असून, प्रशासनाने या नुकसानाची पाहणी करून त्वरित पंचनामे करावी आणि शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी नुकसाग्रस्त शेतकºयांकडून करण्यात येत आहे. शेती नुकसानासहच मंगरुळपीर तालुकयातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाºयाचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
अडाण नदीला आलेल्या पुरामुळे ज्या शेतात पाणी शिरुन पिकांचे नुकसान झाले त्याची पाहणी कृषी व महसूल विभागाकडून तातडीने करण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल महसूल विभाग सादर करणार आहे. संबधितांना नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्यात.
-शंकरराव तोटावार , कृषी अधिक्षक अधिकारी, वाशिम

Web Title: Flood the Adana river; Hundreds of acres of farmland damaged by floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.