गोठ्याला आग; दोन म्हशीचा मृत्यू, दोन लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 05:44 PM2020-03-20T17:44:38+5:302020-03-20T17:45:00+5:30

या घटनेत १० क्विंटल हरभरा, टिनपत्रे, शेतीपयोगी साहित्य जळुन खाक झाले.

Fire at stable; Two buffalo deaths, two lakh loss |  गोठ्याला आग; दोन म्हशीचा मृत्यू, दोन लाखाचे नुकसान

 गोठ्याला आग; दोन म्हशीचा मृत्यू, दोन लाखाचे नुकसान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : येथून जवळच असलेल्या कोठा येथील शेतकरी भगवान मधुकर अवचार यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याने दोन लाखाचे नुकसान झाल्याची घटना १९ मार्च रोजी रात्री ९ वाजतादरम्यान घडली. या घटनेत दोन म्हशीचा मृत्यू झाला. 
शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोठा येथील शेतकरी भगवान अवचार यांचा गावाजवळील शेतातील गोठ आहे. या गोठ्याला १९ मार्च रोजी रात्री  ९ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गोठ्यात बांधलेल्या २ म्हशी (किमत ८० हजार) जागीच जळुन  मृत्यूमुखी पडल्या. तसेच या घटनेत १० क्विंटल हरभरा, टिनपत्रे, शेतीपयोगी साहित्य जळुन खाक झाले. दोन लाखाहून जास्त नुकसान झाल्याची तक्रार भगवान अवचार यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला दिली. घटनेची माहिती मिळताच मालेगावचे तहसिलदार रवि काळे, शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार समाधान वाठोरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा तलाठी केकन यांनी केला. आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भगवान अवचार यांनी केली.

Web Title: Fire at stable; Two buffalo deaths, two lakh loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.