मास्क न वापरणाऱ्यांकडून तीन महिन्यात वसूल केला एक कोटी रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 05:20 PM2021-05-15T17:20:34+5:302021-05-15T17:21:13+5:30

Washim News : २० हजार जणांनी शासन तिजोरीत भरला एक कोटींचा महसूल.

A fine of Rs 1 crore was recovered from those who did not use the mask in three months | मास्क न वापरणाऱ्यांकडून तीन महिन्यात वसूल केला एक कोटी रुपयांचा दंड

मास्क न वापरणाऱ्यांकडून तीन महिन्यात वसूल केला एक कोटी रुपयांचा दंड

googlenewsNext


वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा, असे वारंवार सांगूनही मास्क न वापरणाºया २० हजार जणांना गत तीन महिन्यांत पोलीस प्रशासनाने एक कोटींचा दंड ठोठावला आहे. यामध्ये रोख १४ लाख ३५ हजार ५०० रुपये तर ई- चालानद्वारे ८५ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ९ मे पासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर आणि हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने वारंवार केले. परंतू, याकडे अनेकजण दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आल्याने पोलीस विभागाने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. १५ फेब्रुवारी ते १३ मे या कालावधीत १९ हजार ९९६ जणांनी मास्कचा वापर केला नसल्याचे आढळून आल्याने ९९ लाख ९८ हजाराचा दंड ठोठावण्यात आला.

Web Title: A fine of Rs 1 crore was recovered from those who did not use the mask in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.