शेतकरी दुहेरी संकटात; पिकांवर किडींचा प्रकोप, फवारणीही ठरतेय घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 02:23 PM2019-09-09T14:23:54+5:302019-09-09T14:24:56+5:30

फवारणी केली नाही, तर पिके हातची जातील आणि फवारणी करावी, तर जीव धोक्यात येईल, त्यामुळे करावे तरी काय, असा प्रश्न शेतकरी आणि शेतमजुरांसमोरही उपस्थित होत आहे. 

Farmers in double crisis; Insect outbreaks on crops, spraying are also dangerous | शेतकरी दुहेरी संकटात; पिकांवर किडींचा प्रकोप, फवारणीही ठरतेय घातक

शेतकरी दुहेरी संकटात; पिकांवर किडींचा प्रकोप, फवारणीही ठरतेय घातक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
उंबर्डा बाजार (वाशिम) : रिमझीम पावसामुळे खरीप पिके बहरत असतानाच या पिकांवर विविध किडींचा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यावर नियंत्रणासाठी शेतकरी कीटकनाशक फवारणी करीत आहेत; परंतु कीटकनाशक फवारणी करताना विषबाधेची भिती आहेच शिवाय पिक मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने या पिकांतील सरपटणाºया प्राण्यांचाही संचार आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांसमोर दुहेरी संकट ओढवल्याचे दिसत आहे.
कारंजा तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तथापि, गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पडत असलेला रिमझीम पाऊस पिकांसाठी फायदेशीर ठरत असला तरी, याच पावसामुळे पिकांवर विविध किडींचा प्रादूर्भाव होत आहे. सोयाबीनसह कपाशीवर मावा, कोकडा, पांढरी माशी, उंटअळी, पाने खाणाºया अळीचा मोठा प्रादूर्भाव झालेला आहे. त्यामुळे शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. तथापि, रिमझीम पावसामुळे पिकांची उंची वाढली असून, शिवार दाट झाले आहे. या पिकांत साप, विंचू आदि सरपटणाºया घातक प्राण्यांचा संचारही वाढला आहे. कमरेच्यावर वाढलेल्या पिकांत फवारणी करताना पंपवर धरावा लागतो. अशात थोडाही वारा आला की, फवारणीचे औषध शेतमजुर, शेतकºयाच्या नाका, तोंडाकडे उडते. त्यामुळे विषबाधेची भिती आहे, तर हा धोका टाळण्याचा प्रयत्न करीत असताना खाली सरपटणाºया प्राण्यांकडे लक्ष राहत नाही. कीटकनाशक फवारणी केली नाही, तर पिके हातची जातील आणि फवारणी करावी, तर जीव धोक्यात येईल, त्यामुळे करावे तरी काय, असा प्रश्न शेतकरी आणि शेतमजुरांसमोरही उपस्थित होत आहे. 

फवारणी करताना शेतमजूराच्या पायाला गुंडाळला साप
उंबर्डा बाजार: सोयाबीन पिकांवरील किडीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतात फवारणी करणाºया शेतमजुराच्या पायालाच साप गुंडाळल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी उंबर्डा बाजार परिसरात घडली. नशिब बलवत्तर म्हणून शेतमजुराच्या लक्षात आल्याने त्याने शेताबाहेर धाव घेतल्याने त्याचा जीव वाचला. दुसºया दिवशी दुसरा शेतमजूर आणि शेतकरी हळदे यांना पुन्हा शेतात मोठा साप दिसला. 
गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण, रिमझीम पावसामुळे खरीप पिकांवर किडींचा प्रादूर्भाव झाला आहे. या किडीवर नियंत्रणासाठी उंबर्डा बाजार येथील शेतकरी वसंतराव हळदे यांनी सोयाबीन पिकावर कीटकनाशक फवारणीचे काम शेतमजुराला दिले. हा शेतमजूर ७ सप्टेंबर रोजी फवारणी करीत असताना दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानक पायावर काही भार पडल्याचे जाणवले. त्याने पाहिले असता पायाला मोठा साप गुंडाळल्याचे दिसले. त्याने लगेच पाय झटकून शेताबाहेर पळ काढला. सुदैवाने सापाने त्याच्या पायाला चावा घेतला नाही. त्यामुळे त्याने फवारणीच सोडून दिली. विशेष म्हणजे दुसºया दिवशी वसंतराव हळद हे दुसºया शेतमजुला घेऊन फवारणीसाठी गेले. त्यावेळीही दोघांना मोठा साप दिसला. त्यामुळे दोघांनीही शेतातून पळ काढला.

Web Title: Farmers in double crisis; Insect outbreaks on crops, spraying are also dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.