कर्जमुक्तीपासून भर येथील शेतकरी वंचित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:29 PM2020-05-25T17:29:35+5:302020-05-25T17:29:43+5:30

परिणामी, खरिप हंगामात नवीन पीककर्ज मिळणेही अशक्य झाले आ

Farmers deprived of debt relief! | कर्जमुक्तीपासून भर येथील शेतकरी वंचित !

कर्जमुक्तीपासून भर येथील शेतकरी वंचित !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भर जहॉगीर (वाशिम) : भर जहॉगीर परिसरातील अनेक शेतकरी महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहिले आहेत. आधार प्रमाणिकरण अपूर्ण असल्याने थकित कर्ज दिसत आहे. परिणामी, खरिप हंगामात नवीन पीककर्ज मिळणेही अशक्य झाले आहे.
शेतकºयांची आर्थिक परिस्थिती विचारात घेता महाआघाडी सरकारने दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले आहे. भर जहॉगीर परिसरातील अनेक शेतकºयांचे पीककर्जाचे पुनर्गठण परस्पर केल्याने तसेच त्यानंतर कर्ज हप्ते न भरल्याने या शेतकºयांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळू शकला नाही. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य उषा गरकळ, भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल गरकळ यांनी मध्यंतरी आंदोलनही केले होते. त्यानंतर देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्याने सर्व प्रक्रिया ठप्प झाली. २४ मार्चपासून लॉकडाउन व संचारबंदी असल्याने आधार प्रमाणिकरणही बंद झाले. परिसरातील अनेक शेतकरी पात्र असूनही कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहिले. कर्ज थकित दाखवित असल्याने कर्जमुक्तीचा सर्व खाते अडचणीत आले आहेत. खरिप हंगामाचा कालावघी जवळ येत असल्याने बियाणे, खते खरेदीसाठी शेतकºयांना पैशाची गरज भासत आहे. परंतू, कर्जमुक्तीचा लाभ नसल्याने नवीन कर्जही मिळणे कठीण झाले आहे. अगोदरच विविध कारणांमुळे शेतकरी संकटात सापडत आहेत. त्यात आता कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नसल्याने शेतकºयांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच जिल्हा मध्यवर्ती बँके्नचे अनेक शेतकºयांचे कर्ज थकित दाखवित आहे. शेतकºयांना दिलासा म्हणून कर्जमुक्तीचा लाभ द्यावा तसेच नवीन कर्ज तातडीने मंजूर करावे, अशी मागणी अल्पभूधारक शेतकरी गंगाधर काष्टे यांनी केली.

Web Title: Farmers deprived of debt relief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.