बीज गुणन केंद्राच्या माध्यमातून उत्पादकता वाढीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 03:28 PM2020-09-20T15:28:34+5:302020-09-20T15:28:44+5:30

बीज गुणन केंद्राच्या माध्यमातून उत्पादकता वाढीचे प्रयत्न

Efforts to increase productivity through seed multiplication centers | बीज गुणन केंद्राच्या माध्यमातून उत्पादकता वाढीचे प्रयत्न

बीज गुणन केंद्राच्या माध्यमातून उत्पादकता वाढीचे प्रयत्न

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम:   जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनचे अपेक्षीत प्रमाणात उत्पादन होत नसल्याने शेकºयांना फारसा फायदा होत नाही. कृषी विभाग आत्माकडून याचे निरीक्षण करण्यात आल्यानंतर सारखे एकच वाण पेरल्याने हा प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शेतकºयांना सोयाबीनच्या वेगवेगळ्या वाणांची माहिती देऊन सोयाबीची पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाची धडपड सुरू आहे. यासाठी आत्माच्यावतीने जिल्ह्यातील चार बीज गुणन केंद्रावर सोयाबीनच्या विविध सहा वाणांची पेरणी करून त्यांची शास्त्रशुद्ध माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जिल्ह्यातील शेतकरी  अनेक वर्षांपासून सोयाबीनच्या एकाच वाणाची पेरणी करीत आहेत. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेत प्रचंड घट येत आहे.  ही समस्या लक्षात घेत प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालय वाशिमकडून जिल्ह्यातील शेतकºयांना सोयाबीनच्या वेगवेगळ्या वाणांची माहिती देऊन. त्यांना आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार सोयाबीन पेरणीसाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी जिल्ह्यातील चार बीज गुणन केंद्रावर सोयाबीनच्या वेगवेगळ्या सहा वाणांची  बीबीएफ पद्धतीने पेरणी करून त्यांची उत्पादकता, कालावधी, तसेच किड प्रतिकार शक्तीसह इतर बाबींची पडताळणी केली जात आहे.  त्यात लवकर येणारे वाण, उशिरा येणारे वाण, पावसाचा ताण सहन करणाºया वाणांचा समावेश आहे. यामुळे  कोणतं वाण आपल्या भागांत अधिक फायदेशीर ठरेल, त्याचा अंदाज घेऊन शेतकºयांना त्याचा वाणाची निवड करता येणार आहे. विशेष म्हणजे या पद्धतीने पेरणी केल्यानंतर केवळ एकरी २० किलो बियाणे लागते. आत्माच्यावतीने या प्रयोगासाठी एमएयूस-१६२, एमएयूस-१५८, जेएस-३३५, केडीएस-७२६ आणि एमएयूएस-६१२ , जेएस-९३०५  या सहा वाणांचा आधार घेण्यात आला आहे. बीज गुणन केंद्राच्या प्रक्षेत्रावर या वाणांची पेरणी करून त्यांची उत्पादकता, कालावधी, वाण प्रसारीत झाल्याचे वर्ष आदिंची माहिती देणारे फलक लावले आहेत. या वाणांना किती शेंगा लागल्या, शेंगांची स्थिती कशी आहे, यासह इतर सर्व माहिती संबंधित बीज गुणन केंद्र प्रमुखांच्यावतीने शेतकºयांना दिली जात आहे. 
 
सहा वाणांची विस्तृत माहिती 
जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केली जाते. तथापि, पेरणीसाठी वारंवार एकच वाण वापरण्यात येते. त्यामुळे अपेक्षीत उत्पादन होत नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर तालुक्यातील वाढा, रिसोड तालुक्यातील वनोजा आणि मानोरा तालुक्यातील विठोली येथील बीज गुणन केंद्राच्या प्रक्षेत्रावर सहा सोयाबीन वाणांची पेरणी करून त्यांच्या उत्पादकतेसह इतर माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात येत असून, त्याची पाहणी करण्यासाठी अनेक शेतकरी भेटी देत आहेत.

Web Title: Efforts to increase productivity through seed multiplication centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.