वाशिम जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेची प्रभावी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 05:43 PM2019-08-27T17:43:59+5:302019-08-27T17:44:17+5:30

लवकरच कलापथक आणि रथयात्रेव्दारा जिल्हाभरात स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे.

Effective awareness of the Clean Survey Campaign in Washim District | वाशिम जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेची प्रभावी जनजागृती

वाशिम जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेची प्रभावी जनजागृती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने गुरूवार, २३ आॅगस्टपासून ग्रामीण भागात स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेस प्रारंभ झाला. याअंतर्गत नेमणूक करण्यात आलेल्या ११ नोडल अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी जनजागृती केली जात आहे. लवकरच कलापथक आणि रथयात्रेव्दारा जिल्हाभरात स्वच्छतेचा जागर केला जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिली.
गावात शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी शौचालयाचा नियमित वापर, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा प्रथम टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता दुसºया टप्प्यातील ‘ओडीएफ’ पडताळणी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत स्तरावर प्राथमिक पडताळणी समिती गठीत करण्यात येऊन आली असून फेरपडताळणी देखील केली जाणार आहे. प्राथमिक पडताळणी तपासणी समितीने गावस्तरावर कशाप्रकारे पडताळणी करायची, याबाबत मार्गदर्शन करण्यासह विस्तार अधिकारी (पंचायत) हे पडताळणी प्रक्रिया सुरू असताना सनियंत्रण करणार आहेत. प्राथमिक पडताळणी तपासणी समितीमध्ये केंद्र प्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका, संबंधित ग्रामपंचायतींमधील एक अंगणवाडी सेविका, एक मुख्याध्यापक अथवा त्यांचे प्रतिनिधी, एक स्वच्छाग्रही, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य, आशा सेविका, महिला बचत गटाची एक सदस्य, जलसुरक्षक आदींपैकी सहा सदस्य असणार आहेत. दरम्यान, या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छताविषयक जनजागृतीस प्रारंभ झाला असून लवकरच कलापथक आणि रथयात्रेच्या माध्यमातूनही स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे. यासाठी वाशिमसह जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून ११ नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी दिली.

Web Title: Effective awareness of the Clean Survey Campaign in Washim District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.