थेट विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यास कटिबद्ध,  शिक्षणमंत्री गायकवाड यांची पत्रकारांना माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 11:53 PM2020-08-15T23:53:59+5:302020-08-15T23:54:30+5:30

शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमाने विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे प्रयत्न शासन प्रशासन करीत आहे.ऑनलाईन शिक्षण प्रणाली वर भर देण्यात येत असून विद्यार्थ्यांचे छंद जोपासणे,वर्गमित्र संकल्पना अशा विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शिकविले जात असून त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे.

Education Minister Gaikwad informed the journalists that he is committed to deliver education directly to the students | थेट विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यास कटिबद्ध,  शिक्षणमंत्री गायकवाड यांची पत्रकारांना माहिती

थेट विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यास कटिबद्ध,  शिक्षणमंत्री गायकवाड यांची पत्रकारांना माहिती

googlenewsNext

वाशिम - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा,विद्यालय,महाविद्यालय आदी सर्व शैक्षणिक क्षेत्र बंद असल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत असून आता विविध उपाय योजनांच्या माध्यमाने थेट विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यास शासन कटिबद्ध आहे अशी माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
स्थानिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिक्षण मंत्री गायकवाड यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी आमदार अमित झनक,काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव सरनाईक,जि.प.उपाध्यक्ष डॉ.श्याम गाभने,मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना,सभापती चक्रधर गोटे,सभापती शोभा गावंडे व शिक्षणाधिकारी अंबादास मानकर हे उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षणमंत्री गायकवाड पुढे म्हणाल्या की,शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमाने विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे प्रयत्न शासन प्रशासन करीत आहे.ऑनलाईन शिक्षण प्रणाली वर भर देण्यात येत असून विद्यार्थ्यांचे छंद जोपासणे,वर्गमित्र संकल्पना अशा विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शिकविले जात असून त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे.भविष्यात राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा अभ्यासक्रम,प्रशिक्षित शिक्षक व अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या व्यवस्थेने विद्यार्थी प्रवेशासाठी वेटिंगवर राहतील असे सांगितले.

Web Title: Education Minister Gaikwad informed the journalists that he is committed to deliver education directly to the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.