‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टरांचा पुढाकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 01:36 PM2020-03-21T13:36:33+5:302020-03-21T13:36:40+5:30

जनजागृतीपर माहितीपत्रके तयार केली असून, शहरातील दर्शनी भागात लावली जाणार आहेत

Doctor's initiative to prevent 'Corona' outbreak! | ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टरांचा पुढाकार!

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टरांचा पुढाकार!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. या कार्यात इंडियन मेडीकल असोसिएशननेही (आयएमए) पुढाकार घेत १९ मार्चपासून जनजागृती सुरू केली.
कोरोना विषाणूच्या संभाव्य धोक्यापासून वेळीच सावध होत प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. काही नागरिकांना कोरोना विषाणूसंदर्भात इत्यंभूत माहिती नसल्याने तसेच जनजागृतीचा अभाव जाणवू नये या उद्देशाने इंडियन मेडीकल असोसिएशनने जनजागृतीपर माहितीपत्रके तयार केली असून, शहरातील दर्शनी भागात लावली जाणार आहेत. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कोरोना विषाणूपासून सावधगिरीचा प्रयत्न म्हणून काय केले पाहिजे यासंदर्भात माहिती दिली जात आहे. जेथे अत्यावश्यकता असेल आणि मास्क व अन्य साहित्य उपलब्ध नसेल तेथे मास्क उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही आयएमए संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांनी सांगितले.
नागरिकांनी स्वत:ला व इतरांना कोरोना विषाणूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. हातांची नियमित स्वच्छता राखावी. शिंकताना-खोकताना नाक-तोंडासमोर रुमाल धरावा, शक्यतोवर घराबाहेर पडू नये, असे आवाहनही आयएमए संघटनेने नागरिकांना केले.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि आवश्यक खबरदारी घेण्याच्या दृष्टिकोनातून इंडियन मेडीकल असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व सदस्य जनजागृती करीत आहेत. शहरात दर्शनी भागात जनजागृतीपर माहितीपत्रक लावले जाणार असून, प्रत्येक हॉस्पिटलमध्येही कोरोना विषाणूसंदर्भात उपयुक्त माहिती देऊन अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले जात आहे.
-डॉ. अनिल कावरखे
जिल्हाध्यक्ष, आयएमए वाशिम

Web Title: Doctor's initiative to prevent 'Corona' outbreak!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.