‘नेट कनेक्टीव्हिटी’अभावी कार्यालयीन कामांचा खोळंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 01:55 PM2019-12-18T13:55:31+5:302019-12-18T13:55:42+5:30

शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सोमवार, १६ डिसेंबरपासून ‘नेट कनेक्टीव्हिटी’ नसल्याचे फलक झळकत आहे.

Disposal of office work due to lack of 'net connectivity'! | ‘नेट कनेक्टीव्हिटी’अभावी कार्यालयीन कामांचा खोळंबा!

‘नेट कनेक्टीव्हिटी’अभावी कार्यालयीन कामांचा खोळंबा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : हल्ली सर्वच कामे आॅनलाईन स्वरूपात झाली असून मालमत्ता खरेदी-विक्री प्रकरणांचे कामकाज चालणाºया दुय्यम निबंधक कार्यालयात तर संगणक आणि इंटरनेटशिवाय कुठलेच काम होणे अशक्य झाले आहे. असे असताना पुरेशा गतीने ‘नेट कनेक्टीव्हिटी’ न मिळण्याची समस्या कायमच असून शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सोमवार, १६ डिसेंबरपासून ‘नेट कनेक्टीव्हिटी’ नसल्याचे फलक झळकत आहे. परिणामी, कामानिमित्त येणाºया नागरिकांना काम न होता तसेच खाली हात परत जावे लागत असल्याने त्यांच्यात रोष व्यक्त होत आहे.
मालेगाव तालुक्यातील तुलनेने सर्वात मोठी ग्रामपंचायत, सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून शिरपूर जैनची ओळख आहे. येथे टोलेजंग इमारतीत दुय्यम निबंधक श्रेणी-१ चे कार्यालय कार्यान्वित असून असंख्य गावे त्याच्याशी जोडलेली आहेत. याठिकाणी शेती, घर, भुखंडांचे खरेदी-विक्री व्यवहार चालण्यासोबतच मालमत्ता दस्ताची नोंदणी करणे, दस्ताच्या सूचीची प्रमाणिक नक्कल देणे, शोध उपलब्ध करणे, ‘नोटीस आॅफ इन्टिमेशन’ची फाईल तयार करून घेणे, जुना मूळ दस्त नोंदणी करून परत देणे, मुद्रांक शुल्क भरण्याच्या प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे, दस्ता नोंदणीसंदर्भात गृहभेटी देणे, विशेष कुलमुखत्यारपत्राचे अधिप्रमाणन करून देणे, मृत्यूपत्रकर्त्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र नोंदणी करणे आदी स्वरूपातील कामे केली जातात. त्यासाठी संगणकांना पूर्ण गतीने ‘नेट कनेक्टीव्हिटी’ मिळणे आवश्यक आहे; मात्र नेमकी हीच समस्या गत काही दिवसांपासून जाणवत असून शिरपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाज यामुळे ठप्प झाले आहे.

Web Title: Disposal of office work due to lack of 'net connectivity'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.