मंगळवारपासून तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाची धूम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 04:52 PM2020-08-10T16:52:21+5:302020-08-10T16:52:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : शहरी भागातील नागरिकांना रानभाज्यांचे महत्व पटवून देण्यासाठी ११ आॅगस्टपासून तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचा प्रारंभ होणार ...

Dhoom of taluka level Ranbhaji Mahotsav from Tuesday in Washim district | मंगळवारपासून तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाची धूम !

मंगळवारपासून तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाची धूम !

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरी भागातील नागरिकांना रानभाज्यांचे महत्व पटवून देण्यासाठी ११ आॅगस्टपासून तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. 
रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक असतात तसेच या रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी केली जात नाही, त्यामुळे पूर्णपणे नैसर्गिक असल्याने या संपत्तीचा योग्य वापर आवश्यक आहे. शहरी भागात राहणाºया नागरिकांमध्ये याबाबत जागृती व्हावी, यासाठी जिल्ह्याचे व तालुक्याचे ठिकाणी ‘रानभाजी महोत्सव २०२०’ साजरा करण्याचे निर्देश  कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात ११ ते १५ आॅगस्ट या कालावधीत तालुकास्तरावर तर १५ आॅगस्ट रोजी वाशिम तालुका व जिल्हास्तरीय ‘रानभाजी महोत्सव २०२०’ महोत्सव होणार आहे, अशी माहिती ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक शंकर तोटावार यांनी दिली.
रानभाजी महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला अन्न सुरक्षा गट, महिला बचत गट, उद्योजक शेतकºयांमध्ये याबाबत जनजागृती करण्यात आली. शेतकºयांनी रानभाजी महोत्सवात आपल्याकडील उपलब्ध असलेल्या रानभाज्यांच्या नोंदणीकरिता तसेच त्याचे विविध पाककृती, प्रक्रियायुक्त पदार्थ यांची नोंदणी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील तालुका अथवा सहाय्यक तंत्रज्ञान व्यनवस्थापक यांच्याकडे करावी लागणार आहे. यासाठी कृषी विभागाने संबंधित संपर्क अधिकाºयांची यादीही जाहिर केली. वाशिम तालुका व जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवासाठी जयप्रकाश लव्हाळे, रिसोड तालुकास्तरीय महोत्सवासाठी मयुर शिरभाते, मालेगाव तालुका सचिन इंगोले, मंगरूळपीर तालुका विजय दुधे, कारंजा व मानोरा तालुकास्तरीय महोत्सवासाठी प्रतिक राऊत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तोटावार यांनी केले.
रानभाजी महोत्सव ‘कोविड-१९’ च्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन पार पाडावयाचा आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ‘आॅनलाईन’ पद्धतीने कार्यक्रमाच्या दिवशी करण्यात येणार आहे.

Web Title: Dhoom of taluka level Ranbhaji Mahotsav from Tuesday in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.