कर्जमाफीस पात्र ९,८०२ शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 02:28 PM2020-02-26T14:28:29+5:302020-02-26T14:28:45+5:30

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारंजा तालुक्यातील ७ शाखांमार्फत ९ हजार ८४८ शेतकरी थकबाकीदार आहेत

Debt waiver: 9802 farmers lists uploaded | कर्जमाफीस पात्र ९,८०२ शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’!

कर्जमाफीस पात्र ९,८०२ शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एप्रिल २०१५ पासून पिक कर्ज थकीत असणाºया शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्ज माफी दिली जाणार आहे. त्यानुसार, जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत कारंजा तालुक्यातील अल्पमुदतीचे पीक कर्ज थकीत असलेले ७ हजार ९७० आणि पुनर्गठणाच्या १ हजार ८७८ अशा एकूण ९ हजार ८४८ शेतकºयांना ५२ कोटी ३६ लाख १६ हजार ९१७ रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. त्यापैकी ९ हजार ८०२ शेतकºयांच्या याद्या पोर्टलवर अपलोड देखील झाल्याची माहिती बँक निरीक्षकांनी मंगळवार, २५ फेब्रूवारी रोजी दिली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारंजा तालुक्यातील ७ शाखांमार्फत ९ हजार ८४८ शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यात कारंजा शाखेतील ३ हजार ४६७, कामरगाव २ हजार २४४, धनज बु. १ हजार ५३६, उंबर्डा बाजार ९३७, काजळेश्वर ४०७, पोहा ५९५ व मनभा शाखेतील ६१६ शेतकºयांचा समावेश आहे. कारंजा तालुक्यात ६२ विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने पिक कर्ज वाटप करण्यात आले. संबंधितांकडे थकीत असलेले ५२ कोटी ३६ लाख १६ हजार ९१७ रुपयांचे कर्ज माफ होणार असल्याची माहिती बँक निरीक्षक डी.एम. वानखेडे यांनी दिली.

Web Title: Debt waiver: 9802 farmers lists uploaded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.