‘वीकेंड लॉकडाऊन’नंतर रस्त्यावर पुन्हा गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:39 AM2021-04-13T04:39:29+5:302021-04-13T04:39:29+5:30

कोरोना रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शासन विविध उपाययोजना करत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी गर्दी टाळणे महत्त्वाचे ...

Crowds on the streets again after 'Weekend Lockdown'! | ‘वीकेंड लॉकडाऊन’नंतर रस्त्यावर पुन्हा गर्दी !

‘वीकेंड लॉकडाऊन’नंतर रस्त्यावर पुन्हा गर्दी !

Next

कोरोना रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शासन विविध उपाययोजना करत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी गर्दी टाळणे महत्त्वाचे असल्याने शासनाने दर शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवार व रविवारी दवाखाने व मेडिकल्स, अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरित सर्व दुकाने बंद होती; परंतु १२ एप्रिलला शहरातील विविध रस्त्यांवर गर्दी झाली होती तसेच विविध शासकीय कार्यालये, बँका, दुकाने याठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. त्याचबरोबर सध्या शासनातर्फे लॉकडाऊनचा निर्णय घेण्याची शक्यता असल्याने खरेदीसाठी नागरिक हे बाजारपेठेत गर्दी करत असल्याचे दिसून आले. आरोग्य विभाग, पोलीस विभाग, पालिका, महसूल विभाग हे कोरोना नियंत्रणासाठी परिश्रम घेत असताना नागरिकांनीसुद्धा प्रशासनास सहकार्य करण्याची गरज आहे.

Web Title: Crowds on the streets again after 'Weekend Lockdown'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.