अवैध धंंद्यांविरोधात नगरसेवकाचे 'भीक मागो' आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 04:50 PM2020-02-25T16:50:54+5:302020-02-25T16:50:59+5:30

भाजपाचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी २५ फेबु्रवारी रोजी दुपारी तहसील कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन केले.

Councilor's 'Beging agitation against illegal businesses | अवैध धंंद्यांविरोधात नगरसेवकाचे 'भीक मागो' आंदोलन 

अवैध धंंद्यांविरोधात नगरसेवकाचे 'भीक मागो' आंदोलन 

Next

लोकमत न्युज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम): शहरात सुरु असलेले वरली, मटका, दारूविक्रीचे अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी येथील भाजपाचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी २५ फेबु्रवारी रोजी दुपारी तहसील कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन केले. या आंदोलनात भाजपाचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होेते.
मंगरुळपीर शहरात सर्रासपणे वरली, मटका, जुगार, देशी आणि गावठी दारूविक्रीचे अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप भाजपा नगरसेवक अनिल गावंडे यांनी केला असून, हे धंदे बंद करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. तथापि, त्याची दखल घेण्यात येत नसल्याने त्यांनी २५ फेब्रुवारी रोजी मंगरुळपीर येथील तहसील कार्यालयासमोर भाजपाचे कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत भीकमागो आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी हाती कटोरा घेऊन भिक्षा मागितली. या आंदोलनाला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद लाभला.

Web Title: Councilor's 'Beging agitation against illegal businesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.