CoronaVirus in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ५३ कोरोना पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 12:40 PM2020-10-06T12:40:29+5:302020-10-06T12:40:41+5:30

CoronaVirus in Washim आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंद ५ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली.

CoronaVirus in Washim: Death of another; 53 corona positive! | CoronaVirus in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ५३ कोरोना पॉझिटिव्ह !

CoronaVirus in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ५३ कोरोना पॉझिटिव्ह !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंद ५ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली. आतापर्यंत ९६ जणांचे मृत्यू झाले. दरम्यान सोमवारी दिवसभरात ५३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या ४६५७ वर पोहोचली आहे. सोमवारी ६३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
आॅक्टोबर महिन्यातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाचा धोका अजून टळला नाही. सोमवारी दिवसभरात ५३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सिव्हील लाईन येथील ३, नवीन पोलीस वसाहत परिसर १, दत्तनगर येथील २, समर्थनगर १, शुक्रवार पेठ येथील १, लाखाळा १, जैन कॉलनी येथील १, देवपेठ १, गणेशपेठ २, आनंदवाडी येथील १, तोंडगाव येथील २, अनसिंग येथील १, जांभरुण भिते येथील १, वारा जहांगीर येथील ५, सावरगाव बर्डे येथील १, रिसोड शहरातील २, मोठेगाव येथील १, नेतन्सा १, मानोरा शहरातील २, वसंतनगर येथील ३, भिलडोंगर येथील १, मालेगाव शहरातील ३, वारंगी येथील १, जऊळका येथील ३, मंगरूळपीर शहरातील १, दाभाडी ३, पिंपळखुटा ३, सनगाव १, सावरगाव येथील १, कारंजा लाड तालुक्यातील भामदेवी येथील ३, कामरगाव येथील १ व्यक्तींचा समावेश आहे. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४६५७ वर पोहचली असून यापैकी ३९५१ जणांनी कोरोनावर मात केली.

Web Title: CoronaVirus in Washim: Death of another; 53 corona positive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.