वाशिम जिल्हा कृषी महोत्सवावर कोरोनाचे सावट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 05:26 PM2021-01-03T17:26:56+5:302021-01-03T17:27:21+5:30

Washim News जिल्हा कृषी महोत्सव होईल की नाही, याकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे.

Coronation at Washim District Agriculture Festival! | वाशिम जिल्हा कृषी महोत्सवावर कोरोनाचे सावट !

वाशिम जिल्हा कृषी महोत्सवावर कोरोनाचे सावट !

googlenewsNext

वाशिम : आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करणे, ग्राहक ते शेतकरी थेट शेतमाल विक्रीची जोड घालणे आदी उद्देशाने दरवर्षी जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने जिल्हा कृषी महोत्सव होईल की नाही, याकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे.
कृषी उत्पादनात वाढ करणे, शेतकºयांचे जीवनमान उंचाविणे,  प्रयोगशील व प्रगतशील शेतकºयांच्या माध्यमातून इतर शेतकºयांना विचाराची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देणे, उत्पादनवाढीसाठी शेतकºयांना प्रोत्साहन देणे, शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्रीची संधी आदी उद्देशातून सन २०१७ पासून जिल्हास्तरावर जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात कृषी प्रदर्शन, प्रगतशील शेतकरी किंवा उद्योजकांची व्याख्याने, कृषी विषयक परिसंवाद, धान्य व खाद्य महोत्सव तसेच फळे, फुले व भाजीपाला महोत्सव आदींचे आयोजन करण्यात येते. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यास सन २०२०-२१ या वर्षात कृषी महोत्सव घेण्यात यावा अन्यथा पुढील आर्थिक वर्षात अर्थात २०२१-२२ मध्ये जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करावे, अशा सूचना कृषी विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेला तीन महिन्यांपूर्वी दिल्या होत्या. सध्या कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने चालू आर्थिक वर्षात जिल्हा कृषी महोत्सव होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. ‘कोरोना’ परिस्थिती पाहून जिल्हा कृषी महोत्सवाबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनात निर्णय घेऊ, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले.

Web Title: Coronation at Washim District Agriculture Festival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.