Corona Virus : दुसरी लाट ओसरली तरी, मुलांबाबत बिनधास्त राहू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 11:01 AM2021-06-10T11:01:18+5:302021-06-10T11:01:24+5:30

Corona Virus: पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत बिनधास्त न राहता विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला जात आहे.

Corona Virus: Even if the second wave subsides, don't worry about the children | Corona Virus : दुसरी लाट ओसरली तरी, मुलांबाबत बिनधास्त राहू नका

Corona Virus : दुसरी लाट ओसरली तरी, मुलांबाबत बिनधास्त राहू नका

Next

- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरत असली तरी पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत बिनधास्त न राहता विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला जात आहे.
पहिल्या लाटेत १८ ते दहा वर्षांआतील मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही. परंतु दुसऱ्या लाटेत १८ वर्षांआतील मुलांनादेखील कोरोना संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. दुसरी लाट ओसरत असल्याने जिल्हावासीयांसाठी ही बाब दिलासादायक ठरत आहे तर दुसरीकडे तिसऱ्या लाटेचा अंदाजही तज्ज्ञांकडून वर्तविला जात असल्याने थोडी धाकधूकही कायम आहे. तिसऱ्या लाटेत १८ वर्षांआतील मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी बालरोगतज्ज्ञांची ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याला प्राधान्य दिले जात असून, वाशिम जिल्ह्यातही टास्क फोर्ससंदर्भात प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आहे. दरम्यान, पालकांनीदेखील अधिक सतर्क राहून मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक ठरत आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी पालकांनी गाफील न राहता मुलांच्या पौष्टिक आहारावर भर द्यावा, मुलांना घराबाहेर पाठवू नये, बालकांमधील कोरोना रोखण्यासाठी विविध प्रकारचे नियमित लसीकरण करावे, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला. जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने तिसरी लाट लक्षात घेता विशेष खबरदारी घेतली जात आहे. 


अशी घ्यावी बालकांची काळजी !
वयाच्या १० वर्षांपर्यंत बालकांचे विविध प्रकारे लसीकरण केले जाते. तिसरी लाट येण्यापूर्वी बालकांना आवश्यक असलेल्या लसी वेळेतच देण्यात याव्या. बालकांना संतुलित, प्रोटीनयुक्त, पौष्टिक आहार द्यावा, नियमित देत असलेले अन्न हेच उत्तम आहे. बाहेरचे अन्न देणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी मुलांना    नेणे टाळावे. पालकांनी आपण स्वत: बाधित होणार नाही, याची         काळजी घ्यावी. फ्रीजचे पाणी, कोल्ड्रिंक्स, पावसात भिजणे         याबाबींपासून लहान मुलांना दूर ठेवावे.


तिसरी लाट येऊच नये, अशी आशा करूया. तिसºया लाटेची शक्यता लक्षात घेता बालकांना फ्ल्यूची लस देणे हा उपाय आहे. दुखणे अंगावर काढू नये. तीन दिवसापेक्षा अधिक काळ बालकाला ताप असल्यास रक्ताच्या विविध चाचण्या कराव्या.                                      - डॉ. हरीष बाहेती, 
बालरोग तज्ज्ञ, वाशिम

Web Title: Corona Virus: Even if the second wave subsides, don't worry about the children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.