रिठद येथे एक कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:44 AM2021-05-06T04:44:16+5:302021-05-06T04:44:16+5:30

00000000 खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास शेलूबाजार : मालेगाव-वाशिम आणि मालेगाव-मेहकर या रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. समोरून येणाऱ्या ...

A corona patient at Rithad | रिठद येथे एक कोरोना रुग्ण

रिठद येथे एक कोरोना रुग्ण

Next

00000000

खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास

शेलूबाजार : मालेगाव-वाशिम आणि मालेगाव-मेहकर या रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना चालकांची दमछाक होत आहे.

00000000000000

पथदिवे दुरुस्तीची मागणी

वाशिम : पोहरादेवी परिसरातील अनेक गावांत मुख्य चौकातील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन पथदिवे दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

000000000000000000

घरकूल अनुदान रखडले

वाशिम : ग्रामीण भागातील विविध योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाचे अनुदान शिरपूर परिसरातील जवळपास ६० लाभार्थींना मिळाले नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

0000000000000000000

गतिरोधक बसविण्याची मागणी

वाशिम : कामरगाव -अमरावती मार्गाचे काम झाल्याने भरधाव वेगाने वाहने धावत आहे. यामुळे गावाजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

0000000000000000000

पोलिसांकडून वाहनांची तपासणी

वाशिम : कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणाच्या पृष्ठभूमीवर दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी रिसोड पोलिसांकडून सुरू आहे. बुधवारी २९ जणांवर कारवाई केली.

01000000000000

चिखली परिसरात विजेचा लपंडाव

वाशिम : चिखली परिसरातील गावांमध्ये विद्युत पुरवठा अधून-मधून खंडित होत असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळीही ही समस्या जाणवत आहे. याकडे महावितरणने लक्ष पुरवावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

00000000000000

सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढले

वाशिम : तोंडगाव परिसरात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढले आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाला विक्रीसाठी लॉकडाऊन काळात कृषी विभागाने व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी होत आहे.

००००००

नाल्या सफाईअभावी आरोग्याला धोका

वाशिम : कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड परिसरात नाल्यांची सफाई नियमित केली जात नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.

0000000000000000

खाद्यतेलाचा दर १६० रुपये प्रतिकिलोवर

वाशिम : सोयाबीन, शेंगदाणा यासह अन्य खाद्यतेलाच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी १४०च्या आत असलेल्या खाद्यतेलाचा दर सध्या १६०ते १७० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे.

Web Title: A corona patient at Rithad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.