Corona cases in Washim : आणखी पाच जणांचा मृत्यू; २४१ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 11:53 AM2021-05-25T11:53:07+5:302021-05-25T11:53:20+5:30

Corona cases in Washim : पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर २४१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

Corona cases in Washim: Five more killed; 241 corona positive | Corona cases in Washim : आणखी पाच जणांचा मृत्यू; २४१ कोरोना पॉझिटिव्ह

Corona cases in Washim : आणखी पाच जणांचा मृत्यू; २४१ कोरोना पॉझिटिव्ह

googlenewsNext

वाशिम : जिल्ह्यात मृत्यूसत्र कायम असून सोमवार, २४ मे रोजी आणखी पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर २४१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३८४८२ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. मृत्यूसत्रही कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. आणखी पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सोमवारी घेण्यात आली. दुसरीकडे नव्याने कोरोना रुग्ण आढळून येत असले तरी कोरोनावर मात करणाºयांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून येते. सोमवारी नव्याने २४१ रुग्ण आढळून आले तर ५७८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील १७ बाधितांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सध्या ३०१५ रुग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत ३५०४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर ४२५ जणांचा मृत्यू झाला. 

Web Title: Corona cases in Washim: Five more killed; 241 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.