Corona Cases in Washim : एकाचा मृत्यू; आणखी दोन पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 07:17 PM2021-07-29T19:17:33+5:302021-07-29T19:17:40+5:30

Corona Cases in Washim: एका जणाचा मृत्यू झाला असून ४ जणांनी कोरोनावर मात केली.

Corona Cases in Washim: Death of one; Two more positives | Corona Cases in Washim : एकाचा मृत्यू; आणखी दोन पॉझिटिव्ह

Corona Cases in Washim : एकाचा मृत्यू; आणखी दोन पॉझिटिव्ह

Next

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून गुरूवार, २९ जुलै रोजी २ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान एका जणाचा मृत्यू झाला असून ४ जणांनी कोरोनावर मात केली. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१,६५३ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. गुरूवारी नव्याने २ रुग्ण आढळून आले तर ४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. उपचारादरम्यान एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंद गुरूवारी घेण्यात आली. मंगरूळपीर व मालेगाव तालु्क्याचा अपवाद वगळता उर्वरीत चार तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१६५३ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०९८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंंत ६३६ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.

Web Title: Corona Cases in Washim: Death of one; Two more positives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.