Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; २७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 05:35 PM2021-06-15T17:35:35+5:302021-06-15T17:35:47+5:30

Corona Cases in Washim : १५ जून रोजी आणखी एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर २७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

Corona Cases in washim : Death of another; 27 Positive | Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; २७ पॉझिटिव्ह

Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; २७ पॉझिटिव्ह

Next

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून मंगळवार, १५ जून रोजी आणखी एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर २७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४११०० वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. मृत्यूसंख्येतही घट येत असल्याच चित्र आहे. मंगळवारी आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. नव्याने २७ रुग्ण आढळून आले तर ८६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील ४ बाधिताची नोंद झाली आहे. मंगरूळपीर शहरात तसेच मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत ४११०० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ३९९५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत ६०२ जणांचे मृत्यू झाले. नागरिकांनी यापुढेही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
 
५३९ सक्रिय रुग्ण
मंगळवारच्या अहवालानुसार नव्याने २७ रुग्ण आढळून आले तर ८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ५३९ रुग्ण सक्रिय आहेत.
 
वाशिम तालुक्यात ३ रुग्ण
मंगळवारच्या अहवालानुसार वाशिम तालुक्यात तीन रुग्ण आढळून आले. मालेगाव शहरात एक तर ग्रामीण भागात एक रुग्ण आढळून आले. कारंजा शहरात एक तर ग्रामीण भागात दोन रुग्ण आढळून आले. रिसोड शहरात सात तर ग्रामीण भागात सहा रुग्ण, मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.

Web Title: Corona Cases in washim : Death of another; 27 Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.