Corona Caseses in Washim : ३२ पॉझिटिव्ह; ५४ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 12:24 PM2021-06-17T12:24:13+5:302021-06-17T12:24:18+5:30

Corona Cases in Washim: ३२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर ५४ जणांनी कोरोनावर मात केली

Corona Cases in Washim: 32 Positive; 54 defeated Corona | Corona Caseses in Washim : ३२ पॉझिटिव्ह; ५४ जणांची कोरोनावर मात

Corona Caseses in Washim : ३२ पॉझिटिव्ह; ५४ जणांची कोरोनावर मात

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून बुधवार, १६ जून रोजी ३२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर ५४ जणांनी कोरोनावर मात केली. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४११३२ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. बुधवारी एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नसल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला. बुधवारी नव्याने ३२ रुग्ण आढळून आले, तर ५४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील ३ बाधिताची नोंद झाली आहे. 
मंगरूळपीर, मानोरा, कारंजा शहरात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. आतापर्यंत ४११३२ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४००१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत ६०२ जणांचे मृत्यू झाले. नागरिकांनी यापुढेही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
 

Web Title: Corona Cases in Washim: 32 Positive; 54 defeated Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.