महावितरणमधील कंत्राटी कामगारांनी केले मुंडन आंदोलन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 06:01 PM2019-07-23T18:01:49+5:302019-07-23T18:06:31+5:30

समस्यांप्रती एल्गार : तांत्रीक अ‍ॅप्रेंटिस, कंत्राटी कामगार संघटनेचा पुढाकार

Contract workers in Mahavidyar staged a mundan agitation! | महावितरणमधील कंत्राटी कामगारांनी केले मुंडन आंदोलन!

महावितरणमधील कंत्राटी कामगारांनी केले मुंडन आंदोलन!

googlenewsNext
ठळक मुद्देसमस्यांप्रती एल्गार : तांत्रीक अ‍ॅप्रेंटिस, कंत्राटी कामगार संघटनेचा पुढाकारमहावितरणमध्ये कार्यरत शिकाऊ उमेदवारांना वाढीव आरक्षण देण्यात यावे, कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे,

वाशिम : महावितरण कंपनीत कार्यरत कंत्राटी कामगारांचे विविध प्रश्न, समस्या प्रलंबित आहेत. त्याविरोधात कामगारांनी एल्गार पुकारला असून २३ जुलै रोजी वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले. 

महावितरणमध्ये कार्यरत शिकाऊ उमेदवारांना वाढीव आरक्षण देण्यात यावे, कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे, महापारेषण, महानिर्मिती या कंपन्यांमध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कामगारांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, सरळ सेवा भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ करावी, कंत्राटी कामगारांना रोजंदारी पध्दतीने कामावर घेवून शाश्वत रोजगाराची हमी द्यावी, कंत्राटी कामगारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समान काम समान वेतन मिळावे, महाराष्ट्र शासन राजपत्रातील अधिसुचनेनुसार कुशल, अकुशल, अर्धकुशल कामगारांच्या किमान मुळ वेतनामध्ये वाढ करून शिकाऊ उमेदवारांचे विद्यावेतन वाढविण्यात यावे, विद्युत सहायक पद भरती करताना परिक्षा घेण्यात यावी, आदी मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांनी तांत्रीक अ‍ॅप्रेंटिस, कंत्राटी कामगार संघटनेच्या नेतृत्वात मुंडन आंदोलन केले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Web Title: Contract workers in Mahavidyar staged a mundan agitation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.