पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचा वाशिम येथे दुचाकी गाड्यांचा ‘ढकलगाडी मोर्चा’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 02:04 PM2018-01-31T14:04:10+5:302018-01-31T14:09:24+5:30

वाशिम : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती व महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्यावतीने वाशिम येथे ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

Congress rally in Washim against petrol and diesel hike | पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचा वाशिम येथे दुचाकी गाड्यांचा ‘ढकलगाडी मोर्चा’  

पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचा वाशिम येथे दुचाकी गाड्यांचा ‘ढकलगाडी मोर्चा’  

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात दुचाकी गाड्यांचा ‘ढकलगाडी मोर्चा’ काढण्यात आला.जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप सरनाईक यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. शिवाजी चौक, पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

वाशिम : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती व महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्यावतीने वाशिम येथे ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
स्थानिक शिवाजी चौकात काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप सरनाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर केंद्र सरकारच्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात दुचाकी गाड्यांचा ‘ढकलगाडी मोर्चा’ काढण्यात आला. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप सरनाईक यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ झाल्याने महिलांचे महिन्याचे बजेट पार कोलमडले आहे. डाळी, धान्य, कडधान्ये, तेल या रोजच्या वापरातील वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने महिला वर्गात संतापाचे वातावरण आहे. अशातच पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंंमतीत वाढ करून सरकारने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, असा आरोप काँग्रेस पदाधिकाºयांनी यावेळी केला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र व राज्य सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरल्याची टीका यावेळी करण्यात आली. या मोर्चातच बैलबंडी ठेवून सरकारने शेतकºयांची कशी भ्रमनिराशा केली, याबाबतही विविध घोषणा देण्यात आल्या. शिवाजी चौक, पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.

Web Title: Congress rally in Washim against petrol and diesel hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.