Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवीत घेतली रामराव महाराजांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 05:58 PM2019-10-14T17:58:01+5:302019-10-14T18:01:21+5:30

बंजारा समाजात पसरलेली नाराजी दुर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची आजची भेट असल्याची चर्चा आहे. 

Chief Minister take Ramrao Maharaj's visit at Poharadevi | Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवीत घेतली रामराव महाराजांची भेट

Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवीत घेतली रामराव महाराजांची भेट

googlenewsNext

मानोरा (वाशिम) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १४ आॅक्टोबर रोजी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या  पोहरादेवी येथे जाऊन संत रामराव महाराजांची भेट घेतली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी मानोरा येथील सभेपूर्वी पोहरादेवीला गेल्यानंतरही रामराव महाराजांची भेट न घेतल्याने बंजारा समाजात पसरलेली नाराजी दुर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची आजची भेट असल्याची चर्चा आहे. 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शुक्रवारी मानोरा येथे प्रचारसभा झाली. त्याच्या दुसºयाच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाशिममध्ये सभा घेतली. दरम्यान, गृहमंत्री शाह हे पोहरादेवीत जाऊनही वेळेअभावी त्यांची रामराव महाराजांशी भेट होऊ शकली नाही. त्यामुळे बंजारा समाजात नाराजी व्यक्त झाली.  ती दुर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्ररित्या सोमवारी पोहरादेवीचा दौरा करून रामराव महाराजांची भेट घेवून आशिर्वाद घेतला. यवतमाळ जिल्ह्यातील   दिग्रस  येथे प्रचारसभेसाठी आलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोहरादेवीत येऊन रामराव महाराजांचे दर्शन घेतले. त्यांची व रामराव महाराजांची पदीर्घ चचार्ही झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जगदंबा देवी व संत सेवालाल महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी कारंजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी, माजी आमदार अनंतकुमार पाटील, बाबुसिंग महाराज, संजय महाराज, भक्तराज महाराज, बलदेव महाराज आदिंची उपस्थिती होती. जगदंबा देवी संस्थानच्या वतीने याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Chief Minister take Ramrao Maharaj's visit at Poharadevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.