वाशिम जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 03:26 PM2019-06-05T15:26:16+5:302019-06-05T15:26:25+5:30

वाशिम : रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर ५ जून रोजी जिल्हाभरातील मुस्लिम समाज बांधवांनी ईदगाह येथे ईद-उल-फितरची नमाज अदा केली.

Celebrate Eid in Washim district! | वाशिम जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी !

वाशिम जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी !

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर ५ जून रोजी जिल्हाभरातील मुस्लिम समाज बांधवांनी ईदगाह येथे ईद-उल-फितरची नमाज अदा केली. जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी झाली.
वाशिम शहरातील ईद गाह येथे बुधवारी सकाळपासून समाजबांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम समाजबांधवांना एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम समाजबांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची ईदगाह येथे उपस्थिती होती. 
रिसोड शहरातही रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासुनच सर्वच समाजातील नागरिकांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत जातीय सलोख्याचे  परिचय दिला. ईद साजरी करण्यासाठी सर्व मुस्लीम बांधव बुधवारी सकाळी ८ वाजतापासुनच चाँदणी चौक येथे जमा झाले होते. यावेळी रिसोडचे शाही इमाम मोहम्मद दयार अब्दुल कदीर यांच्या नेतृत्वात सर्व लहान थोर मुस्लीम बांधव ईदगाह वर पोहचून  सकाळी ९.३० वाजता सामुहीक नमाज पठण करण्यात आली. यावेळी सर्व उपस्थित मुस्लीम बांधवाना शाही इमाम मोहम्मद दयार अब्दुल कदीर यांनी उपदेश देतांना सांगितले  की रमजान महिण्याचे पावित्र आपण वर्षभर जपावे. गोरगरीबांना मदत करा. कुणावरही अन्याय करू नका. समाजात सर्वत्र शांतता नांदण्यासाठी प्रयत्न करा.वाईट गोष्टींन पासुन दुर रहा, असा उपदेश त्यांनी दिला. देशात सर्वत्र शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. ईदगाह परिसरात ठाणेदार अनिल ठाकरे यांच्यावतीने मोठा स्टॉल उभारून गुलाब पुष्प देवुन मुस्लीम बांधवाचे स्वागत आमदार अमित झनक, तहसिलदार राजु सुरडकर, ठाणेदार अनिल ठाकरे, प्रभाकर पाटील यांच्यासह मान्यवरांनी गुलाब पुष्पदेवुन स्वागत केले. याप्रमाणेच शिरपूर, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, अनसिंग, शेलुबाजार, आसेगाव येथेही ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

Web Title: Celebrate Eid in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.