कवठा ते रिसोड या मार्गावरील पुल उखडला; वाहतूक प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 05:24 PM2021-06-19T17:24:16+5:302021-06-19T17:24:29+5:30

Washim News : पूल उखडल्याने चारचाकी वाहनांची वाहतूक प्रभावित झाली आहे.

The bridge from Kawtha to Risod was demolished; Traffic affected | कवठा ते रिसोड या मार्गावरील पुल उखडला; वाहतूक प्रभावित

कवठा ते रिसोड या मार्गावरील पुल उखडला; वाहतूक प्रभावित

Next

वाशिम : संततधार पावसामुळे कवठा ते रिसोड या मार्गावरील पूल उखडल्याने चारचाकी वाहनांची वाहतूक प्रभावित झाली आहे. येत्या आठवड्यात दुरूस्ती करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक यांनी शुक्रवार, १८ जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला.
गत आठवड्यापासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. ११ ते १६ जूनदरम्यान चिखली-कवठा परिसरात संततधार पाऊस झाला. यामुळे कवठा ते रिसोड या दरम्यान असलेल्या पुलाची एक बाजू पुर्णत: उखडली असल्याने चारचाकी वाहनांची वाहतूक प्रभावित झाली आहे. या ठिकाणावरून पायदळ व दुचाकीने वाहनाने ये-जा सुरू आहे; मात्र चारचाकी वाहन जात नसल्याने गैरसोय होत आहे. यंदाच्या पावसाळ्यातील या पहिल्याच मोठ्या स्वरूपातील पावसामुळे प्रशासकीय यंत्रणेचा मान्सूनपूर्व नियोजनातील गाफीलपणा चव्हाट्यावर आला. रिसोड तालुक्यातील निमार्णाधिन पुलांची रखडलेली कामे व अस्तित्वात असलेल्या छोट्या स्वरूपातील जमीन समांतर पुलांमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेकडो हेक्टर शेतजमीन खरडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. धोकादायक अवस्थेतील या पुलांप्रमाणेच कवठा जिल्हा परिषद गटातील विविध ठिकाणच्या रस्त्यांचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्ते व पुलांची दुरूस्ती करणे अपेक्षीत आहे. कवठा ते रिसोड या दरम्यानच्या पुलाची तातडीने दुरूस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्वप्नील सरनाईक यांनी दिला आहे.

Web Title: The bridge from Kawtha to Risod was demolished; Traffic affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.